ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतीय माध्यमांनाही बातम्यांसाठी गुगल- फेसबुककडून पैसे मिळावेत, राज्यसभेत भाजप नेते सुशील कुमार मोदींची मागणी

BJP leader Sushil Kumar Modi's demand in Rajya Sabha that Indian media should get money from Google-Facebook for news like Australia

भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी नुकतेच म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर भारतात कायदा तयार करण्यात यावा, जेणेकरून फेसबुक आणि गुगलसारख्या मोठ्या कंपन्यांकडून भारतातील माध्यमांनाही महसूल मिळेल. राज्यसभेच्या शून्य प्रहरादरम्यान पारंपरिक प्रिंट मीडिया आणि टेलिव्हिजन वाहिन्यांच्या आर्थिक स्थितीचा मुद्दा उपस्थित करत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री म्हणाले की, हे दोन्ही माध्यम प्रकार अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत. BJP leader Sushil Kumar Modi’s demand in Rajya Sabha that Indian media should get money from Google-Facebook for news like Australia


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी नुकतेच म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर भारतात कायदा तयार करण्यात यावा, जेणेकरून फेसबुक आणि गुगलसारख्या मोठ्या कंपन्यांकडून भारतातील माध्यमांनाही महसूल मिळेल. राज्यसभेच्या शून्य प्रहरादरम्यान पारंपरिक प्रिंट मीडिया आणि टेलिव्हिजन वाहिन्यांच्या आर्थिक स्थितीचा मुद्दा उपस्थित करत बिहारचे माजी उपमुख्यमंत्री म्हणाले की, हे दोन्ही माध्यम प्रकार अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहेत.

प्रिंट मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर संकट

ते म्हणाले आहेत की, मी भारत सरकारला ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतातही कायदा करण्याची विनंती करतोय, जेणेकरून गुगल व इतर प्लॅटफॉर्मवर जाहिरातींच्या कमाईतील वाट्यासाठी सक्ती करता येईल आणि भारताच्या प्रिंट व न्यूज टीव्ही वाहिन्यांना आर्थिक संकटापासून वाचवता येईल. सुशील कुमार मोदी म्हणाले की, देशातील प्रिंट मीडिया आणि वृत्तवाहिन्या आर्थिक संकटातून जात आहेत.सुशील कुमार मोदींनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत म्हटले की, अलिकडच्या वर्षांत यूट्यूब, फेसबुक आणि गुगलच्या आगमनानंतर जाहिरातींचा मोठा भाग या टेक दिग्गजांकडे गेला आहे. खर्च न करता ते त्यांच्या व्यासपीठावर इतरांनी तयार केलेल्या न्यूज कंटेंटला दाखवून पैसे कमवत आहेत, पारंपरिक माध्यमांना जाहिरातीच्या उत्पन्नापासून वंचित ठेवले जात आहे. भाजप सदस्याने सांगितले की, ऑस्ट्रेलियात जेव्हा पारंपरिक माध्यमांद्वारे महसूल वाटपासाठी कायदा बनविण्याची बातमी आली, तेव्हा गुगलने सात दिवस न्यूज कंटेंट रोखला होता.

ऑस्ट्रेलिया सरकारने बनवला कायदा

मोदी म्हणाले की, ऑस्ट्रेलिया सरकारने अखेर न्यूज मीडिया डील कोड कायद्याची अंमलबजावणी केली आणि गुगलला महसूल वाटप करण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर अनेक देशांमध्ये कायदे करण्यासाठी पुढाकार घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यसभेच्या शून्य प्रहारादरम्यान बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदींनी पारंपरिक प्रिंट मीडिया आणि वृत्तवाहिन्यांच्या आर्थिक स्थितीचा मुद्दा उपस्थित केला होता.

BJP leader Sushil Kumar Modi’s demand in Rajya Sabha that Indian media should get money from Google-Facebook for news like Australia

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती