BJP leader Ram Kadam Reply To Sanjay Raut Tweet in Shayari, demands narco test of Uddhav Thackeray and anil Deshmukh

राऊतांच्या ट्वीटवर राम कदमांचा शायराना पलटवार, उद्धव ठाकरे- देशमुखांच्या नार्को टेस्टची केली मागणी

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. भाजप नेते व पक्षाचे प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनीही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शायरी केलेल्या ट्विटवर शायराना अंदाजातच टीका केली आहे. त्याच बरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नार्को टेस्टची मागणी करत हप्ते वसुलीतील त्यांच्या वाट्याबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. भाजप नेते व पक्षाचे प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनीही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शायरी केलेल्या ट्विटवर शायराना अंदाजातच टीका केली आहे. त्याच बरोबर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नार्को टेस्टची मागणी करत हप्ते वसुलीतील त्यांच्या वाट्याबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे.

तत्पूर्वी, संजय राऊत यांनी गीतकार जावेद अख्तर यांची शायरी ट्वीट करून लिहिले होते की, ”शुभ प्रभात, हमको तो बस तलाश नए रास्तों की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए हैं.” त्यांच्या या ट्वीटला प्रत्युत्तर देताना राम कदमांनी ‘किस्मत तेरी रीत निराली’ लिहून टीका केली आहे.

राम कदम यांचा राऊतांवर पलटवार

भाजप नेते राम कदम यांनी याप्रकरणी एकामागून एक अनेक ट्विट केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी नार्को टेस्ट करून राजीनामा द्यावा आणि सत्य सांगावे. सरकार आता अग्निपरीक्षेपासून वाचू शकत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे.

त्यांनी दुसर्‍या ट्वीटमध्ये लिहिले की, हिस्सा होता का? हे कधी सांगणार? मोठे उद्योगपती यापुढे महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत. आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रात नवीन उद्योग आणण्याचे धाडस कुठल्या उद्योगपतीला शक्य होईल काय? दुर्दैवाने उत्तर नाही आहे. या सरकारने कोट्यवधी गरिबांचे रोजगार काढून घेतले आहेत.

मंदिरांपूर्वी बिअर बार उघडण्याची घाई करण्याचे कारण कारण आज माहिती झाले. दुर्दैवाने, जर तुम्हाला देशातील संतांच्या मागण्या आणि पालघरच्या संताचा टाहो ऐकू आले असते, तर हे दिवस आले नसते. संतांच्या श्रापापासून कुणी वाचू शकत नाही. ईश्वरी न्यायापासून कोणीही सुटू शकत नाही.

 

महत्त्वाच्या बातम्या

 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*