विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील आंदोलनाकडे शिवसेनेने पाठ फिरवून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला “फोटोसेशन पाठिंबा” देणाऱ्या खासदार संजय राऊतांवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीकास्त्र सोड़ले आहे.BJP leader nilesh rane takes dig at sanjay raut over shiv sena supporting rakesh tikait
दिल्लीत राकेश टिकैत यांना भेटणारे संजय राऊत महाराष्ट्रात कधी मराठा आंदोलकांना भेटायला नाही आले, असे ट्विट राणे यांनी केले आहे. राणे यांच्या ट्विटमध्ये राऊतांना एकेरी संबोधले असले तरी त्यांचा मूळ मुद्दा बरोबर आहे. कारण खरोखरच मराठा आंदोलकांना भेटायला संजय राऊत कधी आले नव्हते.
एवढेच नाही तर ते कार्यकारी संपादक असलेल्या सामनातून मराठा मूक मोर्चांवर “मुका मोर्चा” म्हणजे मुके घेणारा मोर्चा अशी अनर्गल भाषेत टीका करण्यात आली होती. मराठा समाजाचा त्या विरोधात उद्रेक झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माफी मागावी लागली होती.
अशा संजय राऊतांनी आज आज दुपारी गाझीपूरमध्ये जाऊन शेतकरी आंदोलकांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीला आलो आहोत, असे राऊतांनी सांगितले. राऊतांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. या भेटीवरूनच निलेश राणे यांनी राऊतांना आपल्या शैलीत सटकावले आहे.
“राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसे कधी मराठा आंदोलकांना भेटले नाहीत. महाराष्ट्रातील कुठल्याही आंदोलनाला राऊत कधी गेले नाहीत. राऊतांना महाराष्ट्रातले आंदोलनकर्ते नको असतात फक्त महाराष्ट्राचे नाव राजकारणासाठी हवे असते. एक नंबरचे ढोंगी”, अशा शब्दांमध्ये निलेश राणे यांनी टोले हाणले आहेत.