पश्चिम बंगालमध्ये पोलीसराजची बळजोरी, भाजपा नेत्याला दोघा मुलांसह अटक

पश्चिम बंगालमध्ये पोलीसराजची दंडेली सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला आणि त्याच्या दोन मुलांना अटक करण्यात आली. वॉरंटशिवाय पोलीस आमच्या घरात घुसले, असा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील तृणमूल काँग्रेसचे सरकार आम्हाला त्रास देत आहे, असा त्यांचा आरोप आहे. BJP leader arrested with two children in West Bengal


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये पोलीसराजची दंडेली सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला आणि त्याच्या दोन मुलांना अटक करण्यात आली. वॉरंटशिवाय पोलीस आमच्या घरात घुसले, असा दावा त्यांनी केला आहे. राज्यातील तृणमूल काँग्रेसचे सरकार आम्हाला त्रास देत आहे, असा त्यांचा आरोप आहे.

राकेश सिंह याला पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी सकाळी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आपण दिल्लीला निघालो असून, तेथून परतल्यावर चौकशीला येईन, असे त्यांनी पोलिसांना कळविले होते.केंद्र सरकारने त्याला केंद्रीय सुरक्षा दलाची सुरक्षा दिली आहे. तरीही पोलिसांनी त्याच्या घरी छापा घातला, तेव्हा राकेश सिंहच्या दोन मुलांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या दोघांनाही अटक करण्यात आली. याआधी भारतीय जनता युवा मोर्चाची प्रदेश सचिव पामेला गोस्वामी हिला अमली पदार्थ बाळगल्याबद्दल अटक करण्यात आली होती. त्यावेळी तिने हे राकेश सिंह याचे कटकारस्थान असल्याचा आरोप केला होता. तिच्या कारमध्ये ९० ग्रॅम कोकेन सापडले होते.

BJP leader arrested with two children in West Bengal

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*