पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीला भाजपने तिकीट नाकारले, कारण….

वृत्तसंस्था

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांना भाजपाने अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट नाकारले आहे. गुजरात भाजपाकडून काल महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली, त्यात सोनल मोदी यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.BJP denied ticket to PM narendra modi nephew sonal modi for ahamadabad muncipal election

मोदींची पुतणी म्हणून नव्हे तर सामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून मला अहमदाबाद महापालिकेची निवडणूक लढवायची आहे”, असे सोनल मोदी यांनी सांगितले होते. इंडिया टुडेच्या बातमीनुसार सोनल मोदी यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपाकडे तिकीट मागितले होते. काल भाजपाने उमेदवारांची घोषणा केली. पण त्यात सोनल मोदी यांचे नाव नव्हते.

तिकीट नाकारले तरी कार्यकर्ता म्हणून काम करणार :

मला पक्षाने तिकीट नाकारले तरी मी एक समर्पित कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करीत राहीन, असे सोनल मोदी यांनी स्पष्ट केले आहे. सोनल मोदी या नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांची कन्या आहेत. प्रल्हाद मोदी यांचे किराणा मालाचे दुकान असून ते गुजरात फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.या आठवड्याच्या सुरूवातीलाच गुजरात भाजपाने पक्षातील नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचे नाही, असा निर्णय घेतला होता. याबाबत भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांना विचारले असता, सर्वांसाठी नियम सारखेच आहेत असे त्यांनी स्पष्ट केले होते. तोच नियम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नातेवाईकांसाठीही लागू झाला.

21 फेब्रुवारी रोजी मतदान :

गुजरात भाजपा संसदीय मंडळाने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कार्यकर्त्यांना आणि ज्यांनी नगरसेवक म्हणून तीन वेळा काम केले आहे अशांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका) निवडणुकीसाठी निवडणूक लढविण्यासाठी तिकीट दिले जाणार नाही. गुजरातमध्ये 6 महापालिकांसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

BJP denied ticket to PM narendra modi nephew sonal modi for ahamadabad muncipal election

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*