पोलीसांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन प्रकरणे दाबण्याचे सरकारकडून पाप, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची भाजपाची मागणी

जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामं करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जात आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.BJP demands resignation of Home Minister


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जगभर नावाजलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर इतका दबाव कधीही आला नसेल. हुकूमशाही ठाकरे सरकारच्या दबावात त्यांना नको ती कामं करावी लागताहेत. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या झाडण्याचं आणि अनेक प्रकरणं दाबण्याचं पाप या सरकारकडून केलं जात आहे.

त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.देशमुख यांना भाजपातर्फे अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. वाझेंची नेमणूक चालवून घेतलीत, आता त्यांना सॅल्यूटही ठोका हा आदेश मानणार नाही सांगितल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली का?हिरेन यांच्याबाबत बातम्या आल्यानंतरही वाझेंवर काहीच कारवाई झाली नाही. एनआयए चौकशी सुरू होईपर्यंत वाझेंना सांभाळून घेण्याचे आदेशच होते का? इतके भयंकर कट रचणाºयाच्या हाती तपास आणि चोराच्या हातीच चाव्या देण्याइतके मजबूर का झालात गृहमंत्री? असा सवाल करण्यात आला आहे.

पोस्टमार्टेमचा रिपोर्ट, वाझेंचा कथित सहभाग, हिरेन यांच्या पत्नीचे आरोप या सगळ्यानंतर वाझेंच्या मुसक्या आवळणं गरजेचं होतं. पण तसं का झालं नाही? वाझेंना ज्या अदृश्य शक्तींनी संरक्षण दिलं होतं, त्यांच्याच इशाऱ्यावर गृहखाते काम करतंय. गृहखातं तुमच्याकडे खरोखरच आहे की तुम्ही फक्त नामधारी? उत्तर द्याल अनिल देशमुख? असे प्रश्न भाजपाकडून देशमुख यांना विचारण्यात आले आहेत.

सचिन वाझे यांची पाठराखण करणाºया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने, आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला, तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केली होती.

राजकीय आशीवार्दामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे.

BJP demands resignation of Home Minister

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*