आसाममध्ये 92 जागांवर उमेदवार उभे करणार भाजप, बंगालमध्ये दोन टप्प्यांतील उमेदवारांची नावे अंतिम

BJP CEC Meeting For Finalizing Candidates For Assembly Elections Assam West Bengal and Three Other States

आसाम आणि पश्चिम बंगालमधील जागावाटप आणि उमेदवारांची नावे यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत आसाममधील एकूण 92 जागांसाठी भाजपतर्फे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ही बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. BJP CEC Meeting For Finalizing Candidates For Assembly Elections Assam West Bengal and Three Other States


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आसाम आणि पश्चिम बंगालमधील जागावाटप आणि उमेदवारांची नावे यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत आसाममधील एकूण 92 जागांसाठी भाजपतर्फे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ही बैठक गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी आपल्या ट्विटर हँडलवर सभेचा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

सूत्रांनी सांगितले आहे की, भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी निवडणूक समितीसमोर सांगितले आहे की, ममता बॅनर्जींनी भवानीपूरमधून निवडणूक लढविल्यास त्यांना त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायला आवडेल.दुसरीकडे, नंदीग्राम जागेवर शुभेंदू अधिकारी हे भाजपचे उमेदवार असू शकतात. बंगालमध्ये दोन टप्प्यांतील उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. ही यादी दोन दिवसांत जाहीर केली जाईल.

या बैठकीत सर्वप्रथम आसाम कोअरशी चर्चा झाली. ज्यामध्ये पहिल्या दोन टप्प्यांतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. आसाम विधानसभा निवडणुकीत हा पक्ष 92 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचे भाजपच्या सूत्रांकडून समजते. त्याचवेळी भाजपची सहयोगी असम गण परिषद (एजीपी) 26 जागांसाठी उमेदवार उभे करेल, तर युनायटेड पीपल्स पार्टी (यूपीपी) 8 जागांसाठी उमेदवार उभे करेल.

पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंह, बीएल संतोष, राजनाथ सिंह, कैलास विजयवर्गीय, थावरचंद गहलोत, शाहनवाज हुसेन, आसामचे सीएम सर्बानंद सोनोवाल बैठकीत सहभागी झाले होते.

यापूर्वी 2016 मध्ये भाजपने 84 जागांवर निवडणूक लढविली होती. आसामनंतर बंगालच्या दोन टप्प्यांतील 60 उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली. शुक्रवारी रात्री उशिरा किंवा 7 मार्च रोजी भाजप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे.

BJP CEC Meeting For Finalizing Candidates For Assembly Elections Assam West Bengal and Three Other States

दरम्यान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी विधानसभा निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. निवडणूक आयोगाने यासाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. हे लक्षात घेता केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेण्यात आली आहे, या बैठकीत पश्चिम बंगालसह 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होईल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी