ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरूच, राठोड आणि हिरेन प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची भाजपची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई – ठाकरे सरकारची हेराफेरी अजूनही सुरूच आहे. रोज नवीन प्रकार ठाकरे सरकारच्या काळात सुरू आहे. एक गुन्ह्याला लपविण्यासाठी दुसरा गुन्हा केला जातोय. त्यामुळे संजय राठोड आणि मनसुख हिरेन प्रकरणातील पुराव्यांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणीची मागणी भाजपने केली आहे. BJP attacks on Maharashtra Govt.

राठोड प्रकरणातील ध्वनिचित्रफीत सांताक्रूझ येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. तसेच मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदन अहवालातही बदल केले जाण्याची शक्येता आहे. त्यामुळे तातडीने या पुराव्यांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणीची गरज असल्याचे मत भाजपचे आमदार ॲड. आशीष शेलार यांनी मांडले आहे.ते म्हणाले मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल तसेच शवविच्छेदन करतानाच्या नोंदी पोलिसांना पूर्णपणे देण्यात आलेल्या नाहीत. त्यातही बदल केले जात आहेत की काय? अशी शंका आहे. त्यामुळे, या दोन्ही प्रकरणी स्वतंत्र यंत्रणेमार्फत या पुराव्यांची तपासणी व्हावी.

BJP attacks on Maharashtra Govt.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*