मुंबईकरांसाठी भाजप आक्रमक; एकीकडे उद्धव ठाकरे ‘आपडा’ म्हणायचे अन दुसरीकडे कर लादायचे?

भाजपा नगरसेवकांनी सर्व सामान्य मुंबईकरकरिता महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या अशा निवासी ५००चौ.फुट व त्यापेक्षा लहान घरांच्या मालमत्ता करावरील माफी बाबत प्रशासनाला जाब देखील विचारला आहे. BJP aggressive for Mumbaikars


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला मालमत्ता करात सूट देण्यासाठी भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. ५०० चौ.फुटव त्यापेक्षा लहान घरात निवास करणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरावर मालमत्ता करात सूट देण्याबाबत ठराव करूनही त्याची अंमलबजावणीबाबत चालढकल करणाऱ्या प्रशासनाचा व सत्ताधाऱ्यांचा निषेध करून भाजपा नगरसेवकांनी विधी समितीत सभात्याग केला.

सोमवार दि ४ जानेवारी रोजी झालेल्या विधी समिती बैठकीत चर्चा करतांना भाजपा नगरसेवकांनी सर्व सामान्य मुंबईकरकरिता महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या अशा निवासी ५००चौ.फुट व त्यापेक्षा लहान घरांच्या मालमत्ता करावरील माफी बाबत प्रशासनाला जाब देखील विचारला आहे.त्या विषयावर अभिजित सामंत, अतुल शाह, अनिश मकवानी ह्यांनी प्रशासनाने ही माफी त्वरित लागू करावी अशी मागणी केली.अभिजित सामंत ह्यांनी आयुक्तांनी ह्या विषयावर निवेदन करावे अशी मागणी केली आहे.

BJP aggressive for Mumbaikars

आयुक्तांचे प्रतिनिधी सहआयुक्त वागराळकर ह्यांनी ह्या विषयावर भाष्य करण्या बाबत असमर्थता दाखवल्या नंतर भाजपा नगरसेवकांनी ह्या असंवेदनशीलतेचा निषेध केला व सभात्याग केला.एकीकडे उद्धव ठाकरे आपला म्हणायचे अन दुसरीकडे कर लादायच्या दुटप्पी धोरणाला भाजपाने तीव्र विरोध केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*