बॅँकेतील निष्क्रिीय खात्यांची माहिती मिळवून अब्जावधींची फसवणूक, मराठी चॅनलचा प्रमुख आणि संपादकासह आठ जणांना अटक


बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्कीय खाते) खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका मराठी चॅनलच्या प्रमुखाचा समावेश आहे.Billions defrauded by getting information of dormant bank accounts, eight arrested, including Marathi channel chief and editor


विशेष प्रतिनिधी

पुणे : बँकेमध्ये असलेल्या डोरमंट (निष्कीय खाते) खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे अब्जावधीची फसवणूक करणाºया आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका मराठी चॅनलच्या प्रमुखाचा समावेश आहे.काही वर्षांपूर्वी औरंगाबादमधून ए एम न्यूज नावाची मराठी वृत्तवाहिनी सुरू झाली होती. या वृत्तवाहिनीचा प्रमुख परमजित सिंग संधू (वय ४२, रा. औरंगाबाद), संपादक राजेश मुन्नालाल शर्मा (वय ४२, रा. औरंगाबाद), अभिनेते रवींद्र मंकणी यांचा पुत्र रोहन रवींद्र मंकणी (वय ३७, रा. सहकारनगर), सुधीर शांतीलाल भटेवरा ऊर्फ जैन (वय ५४, रा. सिहंगड रोड), रवींद्र महादेव माशाळकर (वय ३४, रा.

अंबाजोगाई रोड, बीड), आत्माराम कदम (वय ३४, रा. मुंबई), मुकेश मोरे (वय ३७, रा. येरवडा), राजेश ममीडा (वय ३४, रा. हैदराबाद), विशाल बेंद्रे (वय ४५, रा. वाशीम) व अनघा मोडक (वय ४०, रा. वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींपैकी ४ जण आयटी इंजिनिअर आहेत. या सर्वांनी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर बँकेतील डोरमंट खात्याचा डेटा मिळविला. या सर्व बँक खात्यात जवळपास २अब्ज १६ कोटी २९ लाख रुपये होते. ही माहिती चोरल्यावर ते एका व्यक्तीला विकणार होते. त्यांची माहिती सायबर पोलिसांना मिळाली.

गेले काही दिवस सायबर पोलीस त्यांच्या मागावर होते. ते महर्षीनगर येथील नयनतारा हाईटस येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गोरे यांना मिळाली. बातमीची खातजमा करुन पोलिसांनी तेथे सापळा रचला. काही वेळात तेथे एका कारमधून एक तरुण आला. त्यानंतर काही वेळाने आणखी पाच पुरुष व एक महिला आली.

पोलिसांनी सर्वांना जागेवरच ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २१६ कोटी २९ लाख ३४ हजार २४० रुपयांची शिल्ल्क असलेल्या बँक खात्यांचा डाटा मिळाला. रोहन रवींद्र मंकणी याने हा डाटा घेऊन पैसे देणारी व्यक्ती सिंहगड रोडवर राहणार असल्याची माहिती दिली.

त्यानुसार पोलीस सिंहगड रोडवरील इमारतीत गेले. तेथे रोहन मंकणी याने सुधीर शांतीलाल भटेवरा हा पैसे देणार आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले. या सर्वांकडून ११ मोबाईल फोन, रोख २५ लाख रुपये, २ कार व एक मोपेड असा तब्बल ४३ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Billions defrauded by getting information of dormant bank accounts, eight arrested, including Marathi channel chief and editor

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था