भारतामध्ये मनुष्यबळाची अफाट शक्ती अविश्वसनीय गोष्टी घडवू शकतो बिल गेट्स यांनी केले कौतुक


भारतामध्ये मनुष्यबळाची अफाट शक्ती आहे, त्याचा योग्य वापर केला तर अविश्वसनीय गोष्टी आपण घडवू शकतो, असे मत बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी व्यक्त केले.


प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतामध्ये मनुष्यबळाची अफाट शक्ती आहे, त्याचा योग्य वापर केला तर अविश्वसनीय अशा गोष्टी आपण घडवू शकतो, असे मत बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी व्यक्त केले.Bill Gates says tremendous manpower of india can create incredible things

एका वृत्तपत्राशी बोलताना गेट्स म्हणाले की, कोरोना साथ हा मोठा धक्काच होता. त्याचा मूल्यमापनात्मक स्पष्ट परिणाम अजून समजलेला नाही, पण मानसिक आरोग्याचे, शैक्षणिक व आर्थिक नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. येत्या दोन ते पाच वर्षांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल.त्यामुळे आताची हानी ही कायमची आहे अशी निराशा बाळगण्याचे कारण नाही. पुढील दोन ते पाच वर्षांत पुन्हा कोरोनासारखी महासाथ येण्याची शक्यता वर्षांत २ टक्के आहे. त्यामुळे अजून दहा वर्षे तरी अशी साथ पुन्हा येणार नाही.

औषधे व लशी येत आहेत, त्यामुळे यापुढील काळात दुर्दैवाने अशी साथ आली तरी ती किरकोळ असेल कारण आपली सज्जता मोठी असणार आहे. आताच्या साथीतही आपण ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया यांनी किती तत्परतेने या साथीला प्रतिसाद दिला हे पाहिले आहे.

त्यामुळे त्या देशांना कमी फटका बसला. आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा कारण त्यात असमानता आहे.
गेटस म्हणाले, पुढील काळात येणाऱ्या प्रश्नांची व्याप्ती आधीच लक्षात आली. आपल्याकडे प्रतिकूल हवामान घटना बऱ्याच प्रमाणात दिसून आल्या. युरोपीय समुदाय व इतर देशांनी त्याबाबत कार्यक्रमही हाती घेतले आहेत.

कोरोना हवामानाशी निगडित आहे हे अजून स्पष्ट नसले तरी हवामानाच्या मुद्याकडे दुर्लक्ष झालेले नाही. त्यावर नियोजन नाही. आता याकडे जास्त गांभीर्याने पाहिले जाईल.

ऑनलाईन शिक्षणात गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी इंटरनेट , संगणक लागतो. आशय तयार करणारे शिक्षक लागतात. ऑनलाईन पद्धतीने शिक्षणात कोरोनानंतर मोठी प्रगती दिसली. शिक्षण सुधारले तर अर्थव्यवस्था सुधारेल. कुशल मनुष्यबळ हा कुठल्याही देशाचा कणा असतो. त्यातूनच प्रगती शक्य असते, असे गेटस यांनी सांगितले.

Bill Gates says tremendous manpower of india can create incredible things

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती