बिहारमध्ये महाआघाडीत फुटीची चिन्हे, कॉंग्रेस-राष्ट्रीय जनता दलात जागावाटप ठरेना

बिहार विधानसभा निवडणुका महिन्यावर आल्या तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात जागांच्या वाटपावरून वाद सुरूच आहेत. त्यामुळे महाआघाडीतच फूट पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे.


विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुका महिन्यावर आल्या तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात जागांच्या वाटपावरून वाद सुरूच आहेत. त्यामुळे महाआघाडीतच फूट पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि नितीशकुमार यांच्या जनता दलामध्ये युती झाली आहे. मात्र, त्यांच्याविरोधातील महाआघाडी मात्र अद्यापही चाचपडत आहे. जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांनी यापूर्वीच महाआघाडीशी नाते तोडले आहे.

सूत्रांनी सांगितले की, आता काँग्रेस आणि राजद यांच्यात मतभेद वाढले असून त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी करायची की नाही? याचा निर्णय आगामी ७२ तासात लालूप्रसाद यादव यांना घ्यायचा आहे.

काँग्रेसने सुरुवातीच्या चर्चेत ७० जागा सोडण्याचा प्रस्ताव राजदला दिला होता. यासाठी राजद तयार नाही. काँग्रेसने २४२ उमेदवारांची यादी तयार केली आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने असेही म्हटले आहे की, भाजपच्या दबावात राजद ही आघाडी तोडण्याच्या विचारात आहे. आता अंतिम निर्णय लालूप्रसाद यादव हे घेणार आहेत.

काँग्रेसने शुक्रवारपासून निवडणूक प्रचार सुरु करण्याचे ठरविले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पहिली व्हर्च्युअल रॅली घेणार आहेत. बिहारसाठी राहुल गांधी हे ३० ते ३५ सभा घेणार आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*