बिहारमध्ये जदयू – भाजप ५० – ५०% फॉर्म्युला; पासवानांचा पक्ष स्वतंत्र लढणार

  • एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
  • २४3 विधानसभा जागांसाठी ११९ – ११९ जागांवर जदयू – भाजप लढणार
  • ५ जागा मांझीच्या ‘हम’साठी सोडल्या

वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीत महाआघाडीने शुक्रवारी सहयोगी पक्षांमध्ये जागांच्या वाटपाबाबत अंतिम शिक्कामोर्तब केला तर एनडीएतही तडकाफडकी जागावाटपाचा निर्णय झाला.

सूत्रांनुसार, जदयू आणि भाजप ५० – ५० % जागांवर निवडणूक लढवणार आहेत. विधानसभेच्या २४3 जागांपैकी जदयू आणि भाजप ११९ – ११९ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

उर्वरित पाच जागा जीतनराम मांझींच्या हमसाठी सोडल्या. भाजप आणि जदयूने या फॉर्म्युल्यावर सहमती दर्शवली. राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला एनडीएतून बाहेर ठेवले आहे.

एनडीएच्या या जागावाटपाबाबत भाजप ठाम राहिला, याचा फायदा असा झाला की, जदयू जेवढ्य जागांवर लढेल, त्याच जागेवर भाजपला लढावे लागेल.

जदयूला भाजपपेक्षा सुमारे १५ ते २० जागा जास्त लढवायच्या आहेत अशी चर्चा रंगली होती. मात्र भाजप नेते जागा वाटप बरोबरीत करण्यावर ठाम होते. यामुळे हा मुद्दा खेचला गेला. अखेर ५० – ५०% फॉर्म्युला ठरला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*