बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार करणार का हा वादग्रस्त कायदा?, वॉरंटशिवाय कोणालाही होणार का अटक?

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमध्ये आता वॉरंटशिवाय कोणालाही अटक करण्याचा कायदा होणार आहे. यासंबंधीचे विधेयक मुख्यमंत्री नितीश कुमार सरकार गेल्या आठवड्यात सादर करणार होते. मात्र विरोधकांनी त्याला विरोध करीत सभागृहात गदारोळ केल्याने ते सादर होऊ शकले नाही. हे विधेयक मंगळवारी (ता. २३) सादर होण्याची शक्यता आहे. Bihar govt. proposes new lawराज्यात मेट्रो, रस्ते, पूल आदींच्या सुरक्षेसाठी शस्त्रास्त्र पोलिसांची नवी व्यवस्था करण्यातत येत आहे. लष्कराची जागा हे पोलिस दल घेईल. ही तुकडी अत्यंत आधुनिक आणि कुशल असेल. कोणाही संशयितास वॉरंटशिवाय अटक करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आहे. तसेच अटकेतील व्यक्तीला २४ तासांच्या आत न्यायालयात सादर करण्याची गरज राहणार नाही, असा दावा सरकारने केला आहे. हा काळा कायदा असल्याचे सांगत विरोधकांनी ‘बिहार शस्त्रास्त्र कायदा सुधारित विधेयक २०२१’च्या प्रती शुक्रवारी (ता.२२) फाडल्या.

Bihar govt. proposes new law

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*