Bihar Election Results 2020 : परिवर्तनाच्या बाता करणाऱ्या शिवसेनेचा परफॉर्मन्स “नोटा”पेक्षा घसरला


वृत्तसंस्था

पाटणा : Bihar election results 2020 – बिहारमध्ये जंगलराज बदलून मंगलराज सुरू होण्याच्या बाता मारणाऱ्या शिवसेनेचा बिहारमधला परफॉर्मन्स “नोटा”पेक्षा घसरला आहे. शिवसेनेने मोठा आव आणत ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करून २० जागा लढविल्या. आणि ०.०५ टक्के नोटापेक्षाही कमी मते मिळविण्याचा “पराक्रम” केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी सकाळी राणा भीमदेवी थाटात बिहारमध्ये आज जंगलराज जाऊन मंगलराज येईल, असे ट्विट केले होते. पण स्वतःच्या पक्षाच्या कामगिरीविषयी मौन बाळगले होते. मतमोजणी जशी पुढे सरकली तशी शिवसेनेची नोटापेक्षाही घसरती कामगिरी त्यातून पुढे आली.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. सुरूवातीला तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने मुसंडी मारली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये हे चित्र बदलत गेले. सध्या एनडीएने मुसंडी मारली आहे. तर महाआघाडीची घसरण होताना दिसत आहे. एनडीए सत्तेत येण्याचे कल येत असतानाच भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ज्यांच्याशी हात मिळवले डुबले, असे ट्विट भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे. Bihar Election Results 2020

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत होते. मात्र, मतमोजणीच्या फेऱ्या वाढताना महाआघाडीची घसरगुंडी उडाली. तर एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएने बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. “राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली. तेव्हा सपा पराभूत, डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हरले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव,” असे म्हणत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधी व काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Bihar Election Results 2020

@RahulGandhi यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. @yadavakhilesh सोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली तेव्हा सपा पराभूत. डाव्यासोबत पश्चिम बंगाल मध्ये गेले डावे सपाटून @MamataOfficial समोर हरले. आणि आता @yadavtejashwi सोबत @INCIndia गेले आणि तिथेही आता पराभव

Bihar Election Results 2020

सध्या २४३ मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या एनडीए १२७ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा ७३, जदयू ४७, तर व्हीआयपी पक्षाचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे महाआघाडी १०० ठिकाणी आघाडीवर आहे. यात राजद ६१, काँग्रेस २०, डावे १९ जागांवर आघाडीवर आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था