biggest blow to Mamata, Trinamool leader MP Shishir Adhikari will join BJP

ममतांना सर्वात मोठा धक्का, तृणमूलचे दिग्गज नेते खासदार शिशिर अधिकारी भाजपमध्ये करणार प्रवेश

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सर्वात मोठा झटका बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून तृणमूलला सुरू असलेल्या गळतीने आता परमोच्च बिंदू गाठलाय असे म्हणता येईल. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी हे भाजपमध्ये दाखल होणार आहेत. स्वत: शिशिर अधिकारी यांनी म्हटलंय की, मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. biggest blow to Mamata, Trinamool leader MP Shishir Adhikari will join BJP


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सर्वात मोठा झटका बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून तृणमूलला सुरू असलेल्या गळतीने आता परमोच्च बिंदू गाठलाय असे म्हणता येईल. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार शिशिर अधिकारी हे भाजपमध्ये दाखल होणार आहेत. स्वत: शिशिर अधिकारी यांनी म्हटलंय की, मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

खासदार शिशिर अधिकारी हे नंदिग्राममधून सीएम ममता बॅनर्जींना आव्हान देणाऱ्या शुभेंदू अधिकारी यांचे वडील आहेत. बुधवारीच शुभेंदू म्हणाले होते की, शिशिर बाबू (शिशिर अधिकारी) पंतप्रधानांच्या मिदनापूर कांची येथील सभेत सहभागी होणार आहेत. पीएम मोदींची ही सभा 20 मार्च रोजी होणार आहे.शुभेंदू अधिकारी यांच्याशिवाय त्यांचे भाऊ सौमेंदू अधिकारीही यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. शुभेंदूचे दुसरे बंधू दिव्येंदू अधिकारी हेदेखील तृणमूलचे खासदार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून शिशिर अधिकारी तृणमूलच्या कार्यक्रमांपासून दूरच आहेत; पण त्यादरम्यान ते स्वत: म्हणाले की, आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आदल्या दिवशी टीएमसीचे खासदार शिशिर यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, मी माझ्या मुलाला (शुभेंदू) साथ देईन. त्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत जाण्यास सांगितले तर मी नक्कीच जाईन. ते असेही म्हणाले की, जर त्यांनी मला भाजपमध्ये येण्यास सांगितले तर मी नक्कीच जाईन.

विशेष म्हणजे नुकतेच भाजपचे खासदार लॉकेट चॅटर्जी शिशिर अधिकारी यांना त्यांच्या निवासस्थानी भेट देण्यासाठी गेले होते. त्यानंतर शिशिर अधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले होते.

biggest blow to Mamata, Trinamool leader MP Shishir Adhikari will join BJP

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*