Big reveal on who prepared the blueprint of the international conspiracy against India read in detail

मोठा खुलासा! भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कटाची ब्ल्यू प्रिंट तयार करणाऱ्यांचा भंडाफोड, वाचा सविस्तर…

शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी ट्विट करून लागल्याने अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले. पॉप सिंगर रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा आणि पूर्वाश्रमीची एडल्ट स्टार मिया खिलाफा ही काही त्यातील नावे आहेत. परंतु शेतकरी आंदोलनाचे निमित्त करून भारताची जगभरात बदनामी करण्याचा आंतरराष्ट्रीय कट यानिमित्ताने उघड झाला आहे. या सर्व सेलिब्रिटींना कोणी माहिती पुरवली, यांना कृषी कायद्यांची पूर्ण माहिती आहे का?, भारताविरुद्ध आकसबुद्धीने कोण वागतोय? एवढेच नाही तर एकाच वेळी चहुबाजूंनी भारतावर टीका करण्याची रूपरेषा कशी ठरली, कुणी आखली? असे गंभीर प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. Big reveal on who prepared the blueprint of the international Propaganda against India read in detail


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी ट्विट करून लागल्याने अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले. पॉप सिंगर रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा आणि पूर्वाश्रमीची एडल्ट स्टार मिया खिलाफा ही काही त्यातील नावे आहेत. परंतु शेतकरी आंदोलनाचे निमित्त करून भारताची जगभरात बदनामी करण्याचा आंतरराष्ट्रीय कट यानिमित्ताने उघड झाला आहे. या सर्व सेलिब्रिटींना कोणी माहिती पुरवली, यांना कृषी कायद्यांची पूर्ण माहिती आहे का?, भारताविरुद्ध आकसबुद्धीने कोण वागतोय? एवढेच नाही तर एकाच वेळी चहुबाजूंनी भारतावर टीका करण्याची रूपरेषा कशी ठरली, कुणी आखली? असे गंभीर प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत.

कोणी तयार केली ब्लू प्रिंट?

याच प्रश्नांचा धांडोळा घेत असताना भाजप नेते ताजिंदर पालसिंग बग्गा यांनी भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय कटाचे ब्लू प्रिंट कोणी तयार केले याची माहिती ट्विटद्वारे शेअर केली आहे. बग्गा यांनी सांगितले की, हे खाते एका मरीन पॅटरसन नावाच्या महिलेचे खाते आहे. मरीन पॅटरसन नावाच्या एका महिलेने भारत सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध कटाची ब्लू प्रिंट तयार केली. भाजप नेते तजिंदर पालसिंह बग्गा यांनी ट्विटरवर याचे फोटोग्राफ्सही शेअर केले आहेत.

ही मरीन पॅटरसन नावाची महिला कोण आहे याबद्दल कोणालाही कल्पना नाही. कारण हे खाते आता अस्तित्वात नाही. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अशी अनेक बनावट खाती तयार करण्यात आली होती. सोशल मीडियावर या कागदपत्रांचा स्क्रीनशॉट शेअर करून बग्गा यांनी प्रश्न विचारला आहे की मरीन पॅटरसन कोण आहे?ग्रेटाने डिलीट केले ते ट्वीट

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने बुधवारी तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले होते, ज्यात तिने गुगल डॉक्ट्यूमेंटची लिंक शेअर केली होती. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा कसा विरोध करायचा, याबाबतची पूर्ण रूपरेखा होती. परंतु नंतर या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही सुरुवात झाली. हे पाहून नंतर ग्रेटा थनबर्गने ते ट्विट हटवले. यानंतर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ग्रेटाच्या ग्लोबल फार्मर्स स्ट्राइक टूल किटची कागदपत्रे शेअर केली. या कागदपत्रांनुसार हे परकीय लोक खूप आधीपासून प्रजासत्ताक दिनी उसळलेल्या दंगलीची तयारी करत असल्याचे दिसून येते.

Big reveal on who prepared the blueprint of the international Propaganda against India read in detail

Big news! Greta Is Puppet Of International Propaganda against India

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*