मोठी बातमी! मर्यादेपेक्षा जास्त मद्य घरात ठेवायचे असल्यास आता यूपीमध्ये लायसन्स सक्तीचे

Big news Licensing is now mandatory In UP if you want to keep alcohol in the house beyond the limit

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार निर्धारित प्रमाणापेक्षा एखाद्याला घरात मद्याचा साठा करायचा असले तर त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घ्यावा लागेल. Big news Licensing is now mandatory In UP if you want to keep alcohol in the house beyond the limit


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार निर्धारित प्रमाणापेक्षा एखाद्याला घरात मद्याचा साठा करायचा असले तर त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना घ्यावा लागेल. यासाठी सरकारला दरवर्षी 12 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. एवढेच नाही, अबकारी विभागाला 51 हजार रुपये सुरक्षा ठेव म्हणून द्यावी लागेल.उत्पादन शुल्क विभागाचा गृह परवाना अशा लोकांसाठी असेल जे मागच्या 5 वर्षांपासून आयकर भरत आहेत. जो कोणी या परवान्यासाठी अर्ज करेल त्याला अर्जासोबत पॅनकार्ड व आधार कार्डची प्रत द्यावी लागेल. इतकेच नाही, तर अर्जदाराला प्रतिज्ञापत्रही द्यावे लागेल. त्यानुसार कोणत्याही अनधिकृत किंवा 21 वर्षांखालील व्यक्तीस ज्या ठिकाणी दारू साठवली आहे तेथे प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश सरकारने आणलेल्या नवीन धोरणानुसार देशी व विदेशी दारूशिवाय बिअर व भांगेची किरकोळ दुकाने व मॉडेल शॉप्सच्या परवान्यांचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. देशी व विदेशी दारूच्या किरकोळ दुकानांसह मॉडेल शॉपच्या परवान्याच्या शुल्कात 7.5 टक्के वाढ करण्यात आली आहे.

Big news Licensing is now mandatory In UP if you want to keep alcohol in the house beyond the limit

महाराष्ट्रात काय आहे स्थिती?

महाराष्ट्रात मद्य सेवन करण्यासाठी परवान्याची आवश्यकता आहे. मात्र परवाना असणाऱ्या व्यक्तीस खासगी ठिकाणी मद्यसेवनास किंवा बाळगण्यास इतर कोणत्याही परवान्याची आवश्यकता नाही. मद्य सेवन परवाना उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही सेवा सशुल्क आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 नुसार ज्या व्यक्तीकडे परवाना आहे, अशी व्यक्ती मद्य बाळगणे, मद्याची खरेदी व वाहतूक करू शकते.

Big news Licensing is now mandatory In UP if you want to keep alcohol in the house beyond the limit

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था