पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तिने ट्वीट केले की, ‘आम्ही भारतातील शेतकरी आंदोलनासाठी एकजूट आहोत.’ पण या ट्विटमागील कारण आणि त्यामागील छुपा हेतू आश्चर्यकारक आहे. यात ग्रेटा थनबर्ग शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली भारत बदनाम करू इच्छित असलेल्या जागतिक प्रचाराचा एक भाग असल्याचे दिसून येते. Big news! Greta Thunberg Is Puppet Of International Propaganda against India
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg) केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तिने ट्वीट केले की, ‘आम्ही भारतातील शेतकरी आंदोलनासाठी एकजूट आहोत.’ पण या ट्विटमागील कारण आणि त्यामागील छुपा हेतू आश्चर्यकारक आहे. यात ग्रेटा थनबर्ग शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली भारत बदनाम करू इच्छित असलेल्या जागतिक प्रचाराचा एक भाग असल्याचे दिसून येते.
.@GretaThunberg (accidentally?) just shared a document on details of Jan 26 protests and upcoming online and street protests. Soon, the documented was restricted. Now the tweet has been deleted (I saved it). But incredible. pic.twitter.com/Jt4O1nLGre
— Swati Goel Sharma (@swati_gs) February 3, 2021
ग्रेटा थनबर्गचा खरा हेतू- भारताची बदनामी!
ट्वीटमध्ये ग्रेटा थनबर्ग यांनी भारतातील सत्ताधारी पक्षाला फॅसिस्ट पक्ष म्हटले आहे. यावरून ही एक आंतरराष्ट्रीय कटाची सुनियोजित प्रचार मोहीम असल्याचे स्पष्ट होते. भारत सरकारवर दबाव कसा आणता येईल यासाठी तिने ट्विटद्वारे माहितीही दिली आहे. यासाठी तिने संपूर्ण नियोजनही ट्विटरवर शेअर केले आहे. जे मोठ्या प्रचार मोहिमेशी संबंधित असल्याचे दिसते. ग्रेटाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत आम्ही एकजूट आहोत.” यानंतर दुसऱ्या ट्विटच्या माध्यमातून तिचा खरा हेतू स्पष्ट झाला. तिने एक डिजिटल डॉक्युमेंट शेअर करत भारतावर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याचा सुनियोजित कार्यक्रमच शेअर केला. या ट्विटमध्ये पाच टप्प्यांत दबाव निर्माण करण्याचे सांगण्यात आले आहे.
परंतु, थोड्याच वेळात ग्रेटाने हे ट्विट डिलीट केले आहे. परंतु त्याचे स्क्रीनशॉट मात्र माध्यमांनी काढून ठेवले आहेत.
5 टप्प्यांत आंदोलनाची दिशा…
ग्रेटाने शेअर केलेल्या डॉक्युमेंटमध्ये पाच टप्पे कोणते ते पाहूया, तसेच शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली भारताला बदनाम करण्याचा कट कसा शिजतोय तेही तुमच्या लक्षात येईल. या कटाचे नियोजन खूपच आधी करण्यात आले होते. 25 जानेवारीपूर्वीच काय-काय लिहिले आहे ते खाली पाहा.
1- ऑन ग्राउंड निषेधात सहभागी होण्यासाठी पोहोचा. किसान चळवळीशी एकता दर्शविणारा ईमेल फोटो. हे फोटो 25 जानेवारीपर्यंत पाठवा. (दिल्ली सीमेवरील शेतकर्यांशी एकजुटीचे प्रदर्शन)
२ – डिजिटल स्ट्राइक : #AskIndiaWhy हॅशटॅगसह फोटो / व्हिडिओ संदेश 26 जानेवारीपूर्वी किंवा 26 जानेवारीपर्यंत ट्विटरवर पोस्ट केले जावेत.
3 – 5 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर वादळ आणण्याची योजना, म्हणजे शेतकरी चळवळीशी संबंधित गोष्टी, हॅशटॅग आणि फोटो. यासाठी फोटो, व्हिडिओ संदेश 5 फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत. शेवटचा दिवस 6 फेब्रुवारी असेल.
4 – स्थानिक प्रतिनिधीशी संपर्क साधा, यामुळे भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव येईल.
5 – दोन मोठ्या भारतीय उद्योजक घराण्यांना कमकुवत करणे. जे मोदींच्या राजवटीत जगातील गरिबांवर अत्याचार करत आहेत. आणि जमिनी व परिश्रमावर कब्जा करत आहेत.
ग्रेटाचे हे ट्विट 26 जानेवारीनंतर काय होत आहे, हे स्पष्टपणे दर्शवत आहे. या सर्व प्रकारामागे केवठे मोठे आंतरराष्ट्रीय कुभांड रचले जात आहे तेही स्पष्टपणे दिसून येते आहे.a
— Swati Goel Sharma (@swati_gs) February 3, 2021
भारताविरूद्ध आंतरराष्ट्रीय प्रचार
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताविरुद्ध चालविण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रचाराबद्दल म्हटले की, भारताला लक्ष्य करण्याची मोहीम कधीही यशस्वी होणार नाही. आम्हाला स्वतःवर विश्वास आहे, आम्ही ठाम उभे राहू. भारत हे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही.
भारताविरुद्ध सुनियोजित षडयंत्र
या दोन गोष्टी समजल्यानंतर, हे मान्यच करावे लागेल की शेतकरी आंदोलनाला मिळणारा हा पाठिंबा सुनियोजित रणनीतीचा भाग आहे आणि पूर्णपणे प्रायोजितही आहे. मार्केटिंग कंपन्या त्यांच्या कमाईसाठी आणि भारताच्या बदनामीसाठी ग्रेटा थनबर्ग आणि रिहानासारख्या नामांकित सेलिब्रिटीचा वापर करत आहेत.