Big news: Germany, France, Italy and Spain re-approve AstraZeneca corona vaccine

मोठी बातमी : जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेनकडून पुन्हा अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीला मंजुरी

जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन यांनी पुन्हा अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीद्वारे लसीकरणाची सुरुवात करणार आहेत. युरोपियन युनियनच्या ड्रग रेग्युलेटरी बॉडीने (ईएमए) अ‍ॅस्ट्रॅझेनेका लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर या देशांनी त्याच्या पुनर्वापरास मान्यता दिली आहे. Big news: Germany, France, Italy and Spain re-approve AstraZeneca corona vaccine


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन यांनी पुन्हा अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीद्वारे लसीकरणाची सुरुवात करणार आहेत. युरोपियन युनियनच्या ड्रग रेग्युलेटरी बॉडीने (ईएमए) अ‍ॅस्ट्रॅझेनेका लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतर या देशांनी त्याच्या पुनर्वापरास मान्यता दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच युरोपियन युनियन देशांसह फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन यांनी अॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीच्या वापरास तात्पुरती बंदी घातली होती. आता या देशांमध्ये पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल. या देशांनी या लसीवर बंदी आणण्याचे कारण सांगताना म्हटले होते की, लसीमुळे काही जणांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या आहेत.

ईयू एजन्सीकडून हिरवा कंदील

युरोपियन युनियनच्या ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटीने म्हटले आहे की, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीमुळे रक्तात गुठळ्या होण्याचा धोका नाही. उलट या लसीचे फायदेच जास्त आहेत. याद्वारे युरोपियन देशांमध्ये या लसीद्वारे लसीकरणाचा मार्ग पुन्हा मोकळा झाला आहे.दिग्गज औषधी कंपनी अ‍ॅस्ट्रॅझेनेकाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, लसीकरणाच्या 10 दशलक्षाहून अधिक लाभार्थींचा आढावा घेण्यात आला. यात कोविड-19विरुद्ध ही लस वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आढळले.

डब्ल्यूएचओकडून क्लीन चिट

जागतिक आरोग्य संघटनेने अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या लसीला क्लीन चिट दिली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले की, लसीमुळे गुठळ्या होण्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. संस्थेने असे आवाहन केले आहे की, जगभरात लसींचा वापर थांबविला जाऊ नये आणि देशांनी लसीकरण मोहिमा सुरू ठेवाव्यात.

Big news: Germany, France, Italy and Spain re-approve AstraZeneca corona vaccine

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*