Big news: Anil Deshmukh was traveling on a chartered plane on February 15, Date Which He Claimed quarantine

पवारांच्या क्वारंनटाईन थेएरीला आणखी एक छिद्र! अनिल देशमुखांनी १५ फेब्रुवारीला खाजगी विमानातून केला होता १० जणांबरोबर नागपूर- मुंबई प्रवास..

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. गल्ली ते दिल्ली यावरच चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केलेल्या दाव्यावर स्वतंत्र चर्चा सुरू झाली असून त्यांनी म्हटले होते की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. आता अशी काही कागदपत्रे पुढे आली आहेत, ज्यावरून असे दिसून येते की या काळात अनिल देशमुख हे चार्टर्ड प्लेनमधून प्रवास करत होते. (Anil Deshmukh was traveling on a chartered plane on February 15)


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यायाने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. गल्ली ते दिल्ली यावरच चर्चा सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केलेल्या दाव्यावर स्वतंत्र चर्चा सुरू झाली असून त्यांनी म्हटले होते की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. आता अशी काही कागदपत्रे पुढे आली आहेत, ज्यावरून असे दिसून येते की या काळात अनिल देशमुख हे चार्टर्ड प्लेनमधून प्रवास करत होते.

अनिल देशमुख यांच्याबाबतीत एका चार्टर्ड प्लेनचे कागदपत्र समोर आले आहे. याची 15 फेब्रुवारी 2021 रोजी आहे. यात अनिल देशमुख यांचेही प्रवाशांच्या यादीत नाव आहे. 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी नागपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी चार्टर्ड विमानाने प्रवास केला होता. जेणेकरून ते स्वत:च्या घरी मुंबईत विलगीकरणात राहू शकतील.

काय आहे वाद?

परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे. दरम्यान, सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी अनिल देशमुख यांचा बचाव केला. पवारांनी असा दावा केला की, ज्या काळातील हे आरोप आहेत, तेव्हा तर अनिल देशमुख रुग्णालयात दाखल होते. शरद पवारांनी असा दावा केला की अनिल देशमुख 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान रुग्णालयात दाखल होते आणि त्यानंतर त्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले.

मात्र, शरद पवारांच्या दाव्यानंतर लगेचच भाजपने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ भाजपने रिट्विट केला. शरद पवार दावा करतात की, अनिल देशमुख हॉस्पिटलमध्ये होते, पण ते तर प्रत्यक्षात पत्रकार परिषद घेत होते.

अनिल देशमुख काय म्हणाले?

या वादानंतर अनिल देशमुख यांनी सोमवारी एका व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, 15 फेब्रुवारीपर्यंत ते रुग्णालयात होते, जेव्हा तिथून बाहेर आले तेव्हा काही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. पण आजारपणामुळे ते खुर्चीवर बसले आणि पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते घरी रवाना झाले आणि विलगीकरणात राहिले.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी एका पत्रात दावा केला होता की अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टारगेट दिले होते. यानंतर राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. सोमवारी यावरून संसदेतही हंगामा झाला. असे असूनही अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*