Big news: After 169 days, Kisan Union's agitation ended, railway service resumed in Punjab

मोठी बातमी : तब्बल 169 दिवसांनी किसान युनियनचे धरणे आंदोलन संपले, रेल्वेसेवा पुन्हा बहाल

मागच्या साडेतीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पंजाबमधून शेतकरी आंदोलनाबाबत दिलासादायक वृत्त आले आहे. अमृतसरमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात रेल्वे रुळांवर धरणे करत असलेल्या शेतकर्‍यांनी आंदोलन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे रूळ रिकाम होऊन रेल्वे सेवा पुन्हा बहाल झाली आहे. एवढे दिवस रेल्वेसेवा ठप्प असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, यामुळे 169 दिवसांनी आंदोलन संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Big news: After 169 days, Kisan Union’s agitation ended, railway service resumed in Punjab


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : मागच्या साडेतीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पंजाबमधून शेतकरी आंदोलनाबाबत दिलासादायक वृत्त आले आहे. अमृतसरमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात रेल्वे रुळांवर धरणे करत असलेल्या शेतकर्‍यांनी आंदोलन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेल्वे रूळ रिकाम होऊन रेल्वे सेवा पुन्हा बहाल झाली आहे. एवढे दिवस रेल्वेसेवा ठप्प असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, यामुळे 169 दिवसांनी आंदोलन संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शेतकऱ्यांनी अमृतसरमधील जंडियाला गुरू रेल्वेस्थानकातून निदर्शने थांबवल्यानंतर आता थेट अमृतसर ते दिल्ली अशी वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांच्या निदर्शनामुळे रेल्वे विभागातर्फे केवळ काही गाड्या सुरू होत्या आणि त्यासुद्धा तरणतारणमार्गे अमृतसरला पोहोचत होत्या. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती, परंतु आता रेल्वे गाड्या पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

दरम्यान, अमृतसरमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रुळ रिकामे केले असले तरी दिल्लीच्या सीमेवर अजूनही शेतकर्‍यांचे आंदोलन आहे. टिकरी बॉर्डर, सिंघू बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकरी ठिय्या मांडून आहेत. गतवर्षी नोव्हेंबरअखेरपासून शेतकरी सिंघु, टिकरी आणि गाझीपूर सीमेवर धरणे आंदोलन करत आहेत. त्यातील शेतकरी प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील आहेत.

Big news: After 169 days, Kisan Union’s agitation ended, railway service resumed in Punjab

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*