मोठी बातमी! भारतातील 1115 धरणे धोकादायक श्रेणीत, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात गंभीर इशारा

Big news 1115 dams in India in dangerous category, serious warning in UN report

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाने जगभरातील धरणांसंदर्भात एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार 2025 मध्ये भारतातील एक हजारांहून जास्त मोठी धरणे जवळजवळ 50 वर्षे जुनी होतील, यामुळे अशा जुन्या संरचना भविष्यात धोकादायक ठरू शकतात, असे म्हटले आहे. अहवालानुसार, 2050 पर्यंत जगातील बहुतेक लोकसंख्या 20व्या शतकात बांधलेल्या या हजारो धरणांच्या खाली वसलेली असेल, यामुळे जुन्या धरणांपासून त्यांना गंभीर धोका संभवतो. Big news 1115 dams in India in dangerous category, serious warning in UN report


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाने जगभरातील धरणांसंदर्भात एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार 2025 मध्ये भारतातील एक हजारांहून जास्त मोठी धरणे जवळजवळ 50 वर्षे जुनी होतील, यामुळे अशा जुन्या संरचना भविष्यात धोकादायक ठरू शकतात, असे म्हटले आहे. अहवालानुसार, 2050 पर्यंत जगातील बहुतेक लोकसंख्या 20व्या शतकात बांधलेल्या या हजारो धरणांच्या खाली वसलेली असेल, यामुळे जुन्या धरणांपासून त्यांना गंभीर धोका संभवतो.

संयुक्त राष्ट्रांच्या कॅनडास्थित संस्थेने तयार केला आहे. ‘एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चरः अॅन इमर्जिंग ग्लोबल रिस्क’ नावाचा हा अहवाल आहे. यानुसार, जगभरातील सर्वाधिक 58,800 मोठी धरणे 1930 ते 1970 या काळात बांधली गेली आहेत. ही धरणे 50 ते 100 वर्षांकरिता बांधण्यात आली होती.


पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण, भारतात महापूर आणण्याचा पाकिस्तान-चीनचा डाव


काँक्रीटपासून बनविलेली धरणे साधारणपणे 50 वर्षांनंतर जुनी होतात. म्हणून आता जगातील हजारो धरणे धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत. या धरणांची भिंत फुटण्याचा धोका जास्त आहे. जुन्या धरणांची देखभाल खर्च वाढतो तसेच त्यांची पाणी साठवण्याची क्षमताही कमी होते, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालातील विश्लेषणानुसार, इसवी सन 2050 पर्यंत जगातील बहुतांश लोकसंख्या या हजारो धोकदायक धरणांच्या खालच्या भागात वास्तव्यास असेल. भारत, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जपान, झांबिया आणि झिम्बाब्वेमध्ये बांधल्या गेलेल्या धरणांचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुसार एकूण 32,716 मोठी धरणे म्हणजेच एकूण धरणांच्या 55 टक्के धरणे चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया या चार आशियाई देशांमध्ये आहेत. यातील बहुतांश धरणे लवकरच 50 वर्षांहून जास्त जुनी होतील.

Big news 1115 dams in India in dangerous category, serious warning in UN report

एकट्या भारतातच सन 2025 मध्ये 1115 मोठी धरणे 50 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुनी होतील. 2050 मध्ये देशातील 4,250 पेक्षा जास्त मोठी धरणे 50 वर्षे जुनी होतील आणि 2050 मध्ये 64 मोठी धरणे 150 वर्षांपेक्षा जास्त जुनी होतील. अहवालानुसार, केरळमधील मुल्लापेरियार धरण जर 100 वर्षांपूर्वी बांधले गेले असेल आणि त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर सुमारे पस्तीस लाख लोकांचे जीवन धोक्यात आहे.

Big news 1115 dams in India in dangerous category, serious warning in UN report

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती