देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या गृहमंत्र्यांवर खंडणीखोरीचा सेवेतल्या आयपीएस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप; शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही प्रतिमा काळवंडली

विशेष प्रतिनिधी

मुंबई – देशाच्या इतिहासात प्रथमच एका राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीखोरीचा आयपीएस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप केल्याची घटना घडली आहे. हे आरोप कोणा राजकीय पक्षाच्या नेत्याने नव्हे, तर सेवेत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने केल्याने या आरोपांना अतिशय महत्त्व आहे. BIG NCP leaders including sharad pawar under scanner, ED may enter in to extortion of 100 cr

परमबीर सिंग यांनी पत्राची प्रत राज्यपालांनाही पाठविल्याने या पत्राला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. १०० कोटींच्या खंडणीचे टार्गेट ते देखील गृहमंत्री अनिल देशमुखांकडून… असा आरोप झाल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांना देखील जबरदस्त राजकीय तडाखा बसला आहे.शरद पवार हे ज्येष्ठ नेते असले तरी त्यांच्यावर आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आधीही भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप झाले आहेत. त्यांची राज्यातली प्रतिमा देखील भ्रष्टाचारी पक्ष अशी झाली आहे. त्यात आता सेवेत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने खंडणीखोरीचा आरोप त्यांच्या पक्षाच्या अर्थात राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांवर लावल्याने राष्ट्रवादीची भ्रष्टाचारी पक्षाची प्रतिमा अधिकच काळवंडली आहे.

खंडणीखोरीचा आरोप पत्रातून झाल्यानंतर तसेच हे पत्र मुख्यमंत्र्यांबरोबर राज्यपालांकडेही गेल्यानंतर ते परमबीर सिंगांचे पत्र केंद्रीय एजन्सीकडे देतील. यातून ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. १०० कोटींचे टार्गेट तेही महिन्याला… पत्रात फेब्रुवारी – मार्च या महिन्यांचा उल्लेख आहे. याचा अर्थ आधीही अशी खंडणी गोळा झाली असेल, तर ती रक्कम किती असेल, याचा तपास आणि चौकशी ही ईडी करू शकते. एकूण हे प्रकरण अतिशय गंभीर आणि राष्ट्रवादीला राजकीय दृष्ट्या जबरदस्त तडाखा देणारे ठरू शकते. कारण या पत्राचे लेखक सध्या सेवेत असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने म्हणजे मुंबईचे बदली झालेले पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिले आहे.

BIG NCP leaders including sharad pawar under scanner, ED may enter in to extortion of 100 cr

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*