Big Breaking News; परमबीर सिंगांचा मुख्यमंत्र्यांकडे लेटर बाँम्ब, अनिल देशमुखांनी १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट सचिन वाझेला दिले; देशमुखांच्या कृष्णकृत्यांचा वाचलाय पाढा!!; शरद पवार, अजित पवारांना घेरले

विशेष प्रतिनिधी

मुंबई – सचिन वाझे – मनसुख हिरेन प्रकरणात बदली झालेल्या मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आज तब्बल आठ पानी लेटर बाँम्ब फोडत महाराष्ट्राचे ठाकरे – पवार सरकार हादरवून टाकले. गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या चौघांना घेरले आहे. Big Breaking News; letter by Prambir singh; anil deshmukh gave target of 100 cr collection to sachin vazeअनिल देशमुखांनी सचिन वाझे आणि पीआय पाटील यांना १०० कोटी रूपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा अतिशय खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला. याचीच माहिती आपण उध्दव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह सगळ्या ज्येष्ठ मंत्र्यांना दिली होती, असा दावाही या पत्रात परमबीर सिंग यांनी केला आहे.

सचिन वाझे प्रकरणापासून अन्य प्रकरणांपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कृष्णकृत्यांचा पाढा लिहून परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आठ पानी पत्रात सगळ्यांचा कच्चा चिठ्ठा खोलून टाकला आहे.

या लेटर बाँम्बचा धमाका एवढा मोठा आहे, की त्याच्या कानठळ्या ठाकरे – पवार सरकारला बसल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे अतिप्रचंड खळबळ उडाली असून त्याचे जबरदस्त हादरे ठाकरे – पवार सरकारला बसायला लागले आहेत

Big Breaking News; letter by Prambir singh; anil deshmukh gave target of 100 cr collection to sachin vaze

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*