Big Breaking Home Ministry orders NIA to probe Mansukh Hiren's death case

NIA to probe Mansukh Hiren’s death case : आता NIA करणार मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

अँटिलिया प्रकरणात स्फोटके आढळलेल्या कारचे मालक मनसूख हिरेन यांच्या मृत्यूची चौकशीसुद्धा एनआयए (NIA to probe Mansukh Hiren’s death case) करणार आहे. मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्यांची हत्या झाल्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली आहे. अँटिलिया स्फोटके प्रकरणाची चौकशी आधीपासूनच एनआयए करत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आता त्यांना मनसुख हिरेन प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश जारी केले आहेत. त्यापूर्वी हा तपास महाराष्ट्र एटीएसकडे होता.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अँटिलिया प्रकरणात स्फोटके आढळलेल्या कारचे मालक मनसूख हिरेन यांच्या मृत्यूची चौकशीसुद्धा एनआयए (NIA to probe Mansukh Hiren’s death case) करणार आहे. मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्यांची हत्या झाल्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली आहे. अँटिलिया स्फोटके प्रकरणाची चौकशी आधीपासूनच एनआयए करत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आता त्यांना मनसुख हिरेन प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश जारी केले आहेत. त्यापूर्वी हा तपास महाराष्ट्र एटीएसकडे होता.

आता मनसुख हिरेन मृत्यूच्या तपासाला येईल वेग

या नव्या घडामोडींमुळे या संपूर्ण प्रकरणावर लवकर प्रकाश पडण्याची आशा व्यक्त होत आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एनआयएने सचिन वाझे यांच्याबरोबरच मनसुख हिरेन या प्रकरणाचाही तपास करण्याची मागणी केली होती.

एनआयएने यापूर्वीच आणखी एक मर्सिडीझ आणि टोयोटा लँड क्रूझरची प्राडो कार जप्त केली. या दोन्ही कार वाझेच्या कंपाऊंडमधून जप्त करण्यात आल्या. असे म्हटले जात आहे की वाझे यांनी ही मर्सिडीझ आणि प्राडो कार वापरली. मनसुख हिरेनचा मृत्यूही या मर्सिडीझ कारशी संबंधित असल्याचा संशय आहे. प्राडो नावाच्या वाहनांपैकी एक वाहन रत्नागिरीतील शिवसेनेचे नेते विजयकुमार गणपत भोसले यांच्या नावावर आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली होती.वाझे यांच्यासह 6 जण या प्रकरणात सामील आहेत, असा एनआयएचा दावा आहे. एनआयएने वाझे यांच्या घरातून शर्टसह काही महत्त्वाची पुरावे गोळा केले आहेत. अँटिलियाच्या बाहेर पीपीई किट घातलेल्या संशयिताने मुलुंड टोलनाक्याजवळ ते कपडे जाळले होते.

फडणवीसांनी खोलला होता वाझेंचा कच्चा चिठ्ठा

दोनच दिवसांपूर्वी या संपूर्ण प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मनसुख हिरेनची गाडी सचिन वाझे यांनी खरेदी केली, पण पैसे दिले नाहीत. जेव्हा मनसुख हिरेन म्हणाले की, एकतर गाडी परत करावी किंवा पैसे द्यावेत. तेव्हा सचिन वाझेंनी, त्यांना काही दिवस ठेवून गाडी परत दिली जाईल असे म्हटले होते. कार चोरी झालीच नव्हती. उलट सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांना सांगितले की, त्यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार द्यावी. कोणीही त्यांची तक्रार नोंदवत नव्हता. यावर सचिन वाझे यांनी पोलीस ठाण्यात फोन केला व वाझे यांनीच गुन्हा नोंदवण्यास सांगितले.

‘वाझेंनीच हिरेन यांना मुख्यमंत्री- गृहमंत्र्यांना पत्र लिहायला लावले’

स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर पुढील तीन दिवस फक्त सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेनची चौकशी केली. यानंतर जेव्हा सचिन वाझे यांना असे वाटले की, अन्य पोलीस अधिकाऱ्यांकडूनही मनसुखची चौकशी केली जाऊ शकते, तेव्हा सचिन वाझे यांनीच मनसुख यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना तक्रारीचे पत्र लिहायला लावले. या पत्रात वारंवार चौकशीमुळे आपण त्रस्त असल्याचे मनसुख यांनी लिहिले होते.

‘मनसुख जेथे ठार झाले, त्या जागेशी वाझेंचा 2017चा संबंध’

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, त्यानंतर मनसुखला सचिन वाझेंनी अशा ठिकाणी बोलावले, जेथे 2017 मध्ये खंडणी प्रकरणात त्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली होती. सचिन वाझे यांना 2017च्या खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला होता. धनंजय गावडे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच धनंजय गावडे यांच्या घराजवळ मनसुखचे अखेरचे लोकेशन सापडली आहे. येथे त्यांना मारण्यात आले आणि नंतर त्यांना खाडीत फेकण्यात आले. शवविच्छेदन अहवालात असे म्हटले आहे की, बुडण्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता नाही, कारण त्यांच्या फुप्फुसांत जास्त पाणी नाही. याचा अर्थ असा की त्यांची हत्या झाली आणि नंतर त्यांचा मृतदेह मुंब्राच्या खाडीत टाकण्यात आला.

आता मनसुख हिरेन प्रकरणाचीही चौकशी एनआयएकडे आल्यामुळे लवकरच सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*