Big blow to Rakesh Tikait, 40 lakh tractor strike Opposed by Sanyukta Kisan Morcha

राकेश टिकैत यांना मोठा धक्का, 40 लाख ट्रॅक्टरचा मोर्चा काढण्यावरून संयुक्त किसान मोर्चाने सुनावले खडे बोल

कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले आहे. मोर्चाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीवर धडकण्याचे राकेश टिकैत यांचे विधान त्यांचे वैयक्तिक आहे. सध्या हे आंदोलन 27 फेब्रुवारीपर्यंत होणार असून पुढील रणनीती 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत निश्चित होईल. Big blow to Rakesh Tikait, 40 lakh tractor strike Opposed by Sanyukta Kisan Morcha


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वक्तव्यापासून स्वत:ला दूर केले आहे. मोर्चाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीवर धडकण्याचे राकेश टिकैत यांचे विधान त्यांचे वैयक्तिक आहे. सध्या हे आंदोलन 27 फेब्रुवारीपर्यंत होणार असून पुढील रणनीती 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत निश्चित होईल.

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाने राकेश टिकैत यांच्या पिके नष्ट करण्याच्या आवाहनालाही विरोध दर्शवलेला आहे. शेतकऱ्यांनी पिके नष्ट करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. राकेश टिकैट यांनी पिकांना आग लावण्याचे विधान केल्यापासून आतापर्यंत डझनभर शेतकर्‍यांनी त्यांची पिके नष्ट केली आहेत.याबाबत अखिल भारतीय स्वामिनाथन आयोग संघर्ष समितीचे प्रमुख विकल्प आचार्य म्हणाले की, पिकांना आग लावणे, त्यांचा नाश करणे किंवा आत्महत्या करणे हा आंदोलने करण्याचा मार्ग नाही. पिके आपल्या मुलांप्रमाणे आहेत. कोणीही असे करता कामा नये. पिके नष्ट करणे हे एखाद्याचे वैयक्तिक विधान असू शकते, हा संयुक्त आघाडीचा निर्णय नाही. याव्यतिरिक्त मोर्चाचे सदस्य जगजितसिंग डालेवाला यांनी हे स्पष्ट केले की, संयुक्त किसान मोर्चाचा सध्या दिल्ली कूचसाठी कोणताही कार्यक्रम नाही आणि कोणतीही तयारीही करण्यात आलेली नाही. मोर्चाच्या आगामी बैठकीत पुढील 15 दिवसांचे काय नियोजन आहे याचा निर्णय घेतला जाईल.

पिके नष्ट करण्याबाबत मोर्चाने कधीही सुचविलेले नाही, असेही जगजितसिंग डालेवाला यांनी स्पष्ट केले. मोर्चा शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांचे पीक वाया घालवू नका, असा सल्ला देत आहे. त्याचबरोबर गुरनाम चादुनी असेही म्हणाले की, शेतकरी आपल्या पिकाला स्वत:च्या मुलाप्रमाणेच जपतात, अशा परिस्थितीत त्यांना नष्ट करणे चुकीचे आहे.

Big blow to Rakesh Tikait, 40 lakh tractor strike Opposed by Sanyukta Kisan Morcha

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*