ममता बॅनर्जींना मोठा धक्का; क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा

ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय माजी मंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी तृणमूलला सोडचिट्ठी देत भाजपचा हात धरल्यानंतर १६ दिवसांनी माजी रणजीपटू शुक्ला यांनी राज्याचे मंत्रिपद सोडले आहे. Big blow to Mamata Banerjee; Sports Minister Lakshmi Ratan Shukla resigns


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारला मंगळवारी आणखी एक मोठा हादरा बसला आहे. राज्याचे युवक सेवा आणि क्रीडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे सोपवला आहे.

ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय माजी मंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी तृणमूलला सोडचिट्ठी देत भाजपचा हात धरल्यानंतर १६ दिवसांनी माजी रणजीपटू शुक्ला यांनी राज्याचे मंत्रिपद सोडले आहे. मात्र अद्याप त्यांनी तृणमूलच्या आमदारपदाचा राजीनामा दिलेला नाही.लक्ष्मी रतन शुक्ला हे क्रीडापटू आहेत. त्यांनी खेळासाठी अधिक वेळ देता यावा म्हणून क्रीडा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा कोणीही देऊ शकतो. त्यांच्या राजीनाम्याचा संबंध कुणी पक्षातील नाराजीशी जोडू नये. ते तृणमूलच्या आमदारपदावर कायम राहणार आहेत, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Big blow to Mamata Banerjee; Sports Minister Lakshmi Ratan Shukla resigns

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*