भारतीय वंशाच्या भव्या लाल नासाच्या कार्यकारी प्रमुख

विशेष प्रतिनिधी 

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या भव्या लाल यांची नासा या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती करण्यता आली आहे. भारतीय वंशाची व्यक्ती प्रथमच नासाच्या प्रमुखपदावर नियुक्त झाली आहे.bhavya lal of Indian origin is the executive chief of NASA

भव्या लाल या अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बाइडन यांच्या नासामध्ये बदल करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या सदस्य आहेत. नासाने लाल यांची नियुक्ती करताना जारी केलेल्या घोषणेत म्हटले आहे की त्यांना अभियांत्रिकी आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा दीर्घ अनुभव आहे. भव्या यांनी अणुशास्त्रात मास्टर्स केले आहे. त्याचबरोबर मॅसाच्युएसट  इन्स्टिट्यूट  आॅफ टॅक्नॉलॉजीमधून मास्टर आॅफ सायन्सची पदवी घेतली आहे.त्याचबरोबर  जॉर्ज वाशिंगटन विदयपीठातून  सार्वजनिक नीति आणि सार्वजनिक प्रशासनामध्ये डॉक्टरेट  मिळविली आहे. भव्या लाल यांनी पूर्वीपासूनच नासाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. नासाचे प्रसिध्द कार्यक्रम  इनोवेटिव एडवांस्ड कॉन्सेप्ट्स प्रोग्राम और नासा अ‍ॅडवायरी वाइजरी काउंसिल टेक्नोलॉजी, इनोवेशन एंड इंजीनियरिंग अ‍ॅडव्हायझरी कौन्सिलच्या सदस्य म्हणूनही काम केले आहे.

bhavya lal of Indian origin is the executive chief of NASA

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*