आपत्कालीन केसेसमध्ये अचानक वाढ झाल्यावर भारत बायोटेकची लस वापरणार; डॉ. रणदीर गुलेरियांचा निर्वाळा, सिरमची लसही सुरवातीला वापरणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि भारत बायोटेकने तयार केलेल्या कोरोनाच्या लशीला (कोव्हॅक्सिन) ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी मान्यता दिली. Bharat Biotech vaccine will be used. It can also be used as a backup when we’re not sure how efficacious the Serum Institute vaccine is going

‘आणीबाणीच्या परिस्थिती’त त्यांना चाचणी चालू ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी डेटा मिळविणे आवश्यक आहे. डेटा आल्यानंतर आम्ही सुरक्षितता आणि कार्यक्षमतेपर्यंत अधिक विश्वास ठेवू, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.


आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा प्रकरणांमध्ये अचानक वाढ होते. तेव्हा लसीकरण करणे आवश्यक असते. अशा वेळी भारत बायोटेकची लस वापरली जाईल. सीरम इन्स्टिट्यूटची लस किती कार्यक्षम आहे, याची आम्हाला खात्री नसतानाही या लसीचा उपयोग बॅकअप म्हणून केला जाऊ शकतो, असे डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

Bharat Biotech vaccine will be used. It can also be used as a backup when we’re not sure how efficacious the Serum Institute vaccine is going

सीरम संस्थेची लस सुरुवातीला दिली जाईल. त्यांच्याकडे 50 दशलक्ष डोस उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही 3 कोटी जणांचे लसीकरण करू शकू. तोपर्यंत भारत बायोटेकचा डेटा उपलब्ध होईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*