भंडारा दुर्घटना : तब्बल 21 मिनिटे होरपळत होते चिमुकले, सीसीटीव्हीवरून मोठा खुलासा

महाराष्ट्रातील भंडारा येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत मोठा खुलासा झाला आहे. पोलीस तपासणीत असे आढळून आले की बालके धुरामुळे सुमारे 21 मिनिटे रुग्णालयात टाहो फोडत होती, परंतु त्यांना वाचविण्यासाठी कोणीही खोलीत आले नाही. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांना याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत 10 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, स्थानिक पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदविलेला नाही. Bhandara Tragedy : New Born babys Cried For 21 minutes While Fire Broke out, big revelation from CCTV


विशेष प्रतिनिधी

भंडारा : महाराष्ट्रातील भंडारा येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत मोठा खुलासा झाला आहे. पोलीस तपासणीत असे आढळून आले की बालके धुरामुळे सुमारे 21 मिनिटे रुग्णालयात टाहो फोडत होती, परंतु त्यांना वाचविण्यासाठी कोणीही खोलीत आले नाही. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांना याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत 10 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु, स्थानिक पोलिसांनी अद्याप एफआयआर नोंदविलेला नाही.

पोलिसांचे म्हणणे आहे की, ते न्यायवैद्यक विभागाच्या काही अहवालांची प्रतीक्षा करत आहेत. तथापि, एफएसएलने पोलिसांना प्राप्त डीव्हीआरकडून सीसीटीव्ही फुटेज परत मिळवले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना रात्री 1:40च्या सुमारास घडली. हे सीसीटीव्ही फुटेज त्या खोलीचे आहे जिथे 10 बालकांचा मृत्यू झाला.

सीसीटीव्हीनुसार, तब्बल 21 मिनिटे मुले धुरामध्ये कोंडलेली होती. त्यांना वाचवण्यासाठी कोणीही खोलीत आले नाही आणि त्या रूममध्ये रुग्णालयातील कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. सीसीटीव्हीमधील फुटेजसह ऑडिओदेखील रेकॉर्ड करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती निष्पाप बालके बेंबीच्या देठापासून ओरडताना दिसत आहेत. काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने असेही सांगितले आहे की, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या राज्य संचालकांनी आपल्या अहवालात रुग्णालयाच्या गंभीर दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आहे. त्यानंतर भंडारा पोलिसांनी आणखी काही डीव्हीआर पाठवून काही प्रश्नांची उत्तरे मागवली.या घटनेनंतर भंडारा पोलिसांनी रुग्णालयाचे तीन डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर म्हणजेच डीव्हीआर कलिना एफएसएलमध्ये पाठविले. पोलिसांना एसएनसीयूच्या आत आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज हवे होते, जिथे 10 नवजात मुलांनी आपला जीव गमावला. फॉरेन्सिक विभागाला डेटा म्हणजेच डीव्हीआरकडून सीसीटीव्ही फुटेज मिळविण्यात यश आले आहे. हा व्हिडिओ एसएनसीयूच्या अंतर्गत भागातला आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट दिसते आहे की जेव्हा खोलीत आग होती, तेव्हा 21 मिनिटांपर्यंत कोणीही खोलीत दिसले नाही.

Bhandara Tragedy : New Born babys Cried For 21 minutes While Fire Broke out, big revelation from CCTV

एफएसएलला प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही अहवालानुसार महाराष्ट्र पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आग लागण्याच्या वेळी परिचारिका त्यांच्या नर्सिंग स्टेशनमधून गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे आणि हॉस्पिटलच्या इतर कर्मचार्‍यांना 21 मिनिटांनंतर आग लागल्याची माहिती मिळाली. त्यांच्या कामाच्या ठिकाणी नर्स नसतानाही रुग्णालयाचे दुर्लक्ष सिद्ध होते. या प्रकरणात एफएसएल आपला दुसरा अहवाल या आठवड्याच्या अखेरीस सादर करू शकते.

Bhandara Tragedy : New Born babys Cried For 21 minutes While Fire Broke out, big revelation from CCTV

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*