भंडारा अग्नीतांडव हलगर्जीपणातून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, देवेंद्र फडणवीस यांची मागणी


भंडारा अग्नीतांडवप्रकरणी हलगर्जीपणा झाला आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Bhandara Agnitandav Devendra Fadnavis for culpable homicide


विशेष प्रतिनिधी

भंडारा : भंडारा अग्नीतांडवप्रकरणी हलगर्जीपणा झाला आहे. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Bhandara Agnitandav Devendra Fadnavis for culpable homicide

भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात १० बालकांचा मृत्यू झाल्यावर फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भंडाऱ्यामधील घटना अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. प्रगतीशील महाराष्ट्रात 10 नवजात बालकांचा मृत्यू व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भंडारा येथील दुर्दैवी घटनेवर दुःखं व्यक्त केले ;तत्काळ चौकशीचे आदेश


याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कडक कारवाई करावी. महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, फायर ऑडिट का झाले नाही याची चौकशी व्हावी.

आम्हाला यात कोणतेही राजकारण करायचे नाही. पण, सरकारकडून जे दावे केले जात आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. हे यातून स्पष्ट दिसत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख ऐवजी 10 लाखाची मदत द्यावी. निष्काळजीपणामुळं १० बालकांना जग पाहण्यापूर्वीच प्राण सोडावे लागले, यापेक्षा वेदनादायी आणखी काय असावे?असे सांगून फडणवीस म्हणाले, रुग्णालयात फायर सेफ्टीची कुठलीही व्यवस्था नाही.

Bhandara Agnitandav Devendra Fadnavis for culpable homicide

यासाठीचा प्रस्ताव मे महिन्यात आरोग्य सेवा सहसंचालक आणि पुढे मंत्रालयापर्यंत पोहोचला. त्यावर वेळीच निर्णय झाला असता, तर आज या बालकांचे प्राण वाचले असते. खासगी रुग्णालयांमध्ये तर सुरक्षिततेची सर्व व्यवस्था नसेपर्यंत रुग्णालयाला परवानगी मिळत नाही. पण सरकारी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचे अनेक प्रस्ताव रखडणे ही गंभीर बाब आहे, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायलाच हवी.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था