नेहरूंच्या काळात पूर्व पाकिस्तानात जात होता बंगाल, श्यामाप्रसाद मुखर्जींनी वाचविला, जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन


नेहरूंच्या काळात बंगाल पूर्व पाकिस्तानात जात होता. पाकिस्तानचे दोन तुकडे झाल्यानंतर शामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालला वाचवण्याचे काम केले, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.Bengal was going to East Pakistan during Nehru time rescued by Shyamaprasad Mukherjee jP Nadda statement


वृत्तसंस्था

कोलकत्ता : नेहरूंच्या काळात बंगाल पूर्व पाकिस्तानात जात होता. पाकिस्तानचे दोन तुकडे झाल्यानंतर शामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगालला वाचवण्याचे काम केल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले.

पश्चिम बंगालमध्ये विविध भागांत घेतलेल्या सभांत नड्डा म्हणाले की, मोदींनी बंगामध्ये दरवेळेस सर्वकाही देण्याचा प्रयत्न केला. मात्र ममता यांनी नेहमीच नकारात्मक प्रतिसाद दिला. ममताजी जातील तेव्हा रस्त्यातील अडथळा दूर होईल आणि बंगालच्या जनतेला आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळेल. ममताजी गेल्यानंतर 70 लाख शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळेल. प्रत्येक शेतकऱ्याला 14 हजार रुपये मिळतील. हेच ते परिवर्तन आहे ज्याबद्दल आम्ही बोलत आहे.ममता संस्कृती रक्षणाच्या गोष्टी करतात. ही विवेकानंदजी आणि रविंद्रनाथ टागोरांची भूमी आहे. ममताजी येथील संस्कृती सांभाळू शकत नाहीत. त्याचे रक्षण भाजपचेच लोक करतील. तुम्ही माझ्या नावामागे एक विशेषण लावले होते. तेच सांगते की, तुमची स्वत:ची संस्कृती काय आहे. जय श्रीरामच्या घोषणेने ममतादीदींना इतका संताप का येतो? ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेने ‘नमस्ते आणि टाटा’ म्हणण्याचं निश्चित केलं आहे, असं नड्डा म्हणाले.

जे. पी. नड्डा यांनी मालदामधील शाहपूर गावात ‘शेतकरी सुरक्षा सह-भोज’मध्ये शेतकऱ्यांसोबत जेवण देखील केलं. त्यांना खिचडी आणि भाजी देण्यात आली. कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये २३ जानेवारीला घडलेल्या घटनेकडे त्यांनी लक्ष वेधलं. आपण आलो त्यावेळी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. पण या घोषणा ऐकून ममता बॅनर्जी का संतापल्या हे कळत नाही? असं नड्डा म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकातामधील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये २३ जानेवारीला आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘जय श्रीराम’ च्या घोषणा दिल्या गेल्या. यानंतर ममता बॅनर्जींनी भाषण करण्यास नकार दिला.

Bengal was going to East Pakistan during Nehru time rescued by Shyamaprasad Mukherjee jP Nadda statement

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती