डावा द्वेष : बंगाली नाट्यसंस्थेला वैचारिक कावीळ; भाजपात प्रवेश केल्याने कलाकाराला चक्क नाटकातून डच्चू!

 वृत्तसंस्था

कोलकता : पश्चिम बंगालमधील रणधुमाळीत आणखी एक नाट्य घडले आहे, जे प्रत्यक्ष नाट्य क्षेत्राशी संबंधित आहे. भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून एका कलावंताला नाटकातूनच काढून टाकण्यात आले. Bengal theatre artist joins BJP loses his role in playकौशिक कर असे या कलावंताचे नाव आहे. सौरव पालोधी याच्या ‘इच्छेमोटो’ या नाट्यसंस्थेने त्याला ‘घुम नेई’ या नाटकात भूमिका करण्यासाठी आमंत्रित केले होते. ही नाट्यसंस्था सामाजिक-आर्थिक विषयांवर कलाकृतींची निर्मिती करते. महान कलावंत उत्पल दत्त यांनी १९७०च्या दशकात लिहिलेल्या नाट्यसंहितेवर ‘घुम नेई’ आधारित आहे. देशातील सध्याच्या राजकीय स्थितीविषयी डाव्या विचारसरणीच्या दृष्टिकोनाचा त्यात ऊहापोह आहे.

दिग्दर्शक असलेल्या सौरवने तीन दिवसांपूर्वी फेसबुकवरील आपल्या अधिकृत अकाऊंटवर बंगाली भाषेतून एक पोस्ट लिहून ही माहिती दिली. २०१९ मध्ये कौशिकला या भूमिकेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. गेल्या वर्षी याचे काही प्रयोग झाले होते. नाटकातील कौशिकच्या व्यक्तीरेखेचे नाव २०१५ मधील दादरी प्रकरणाशी संबंधित आहे.

Bengal theatre artist joins BJP loses his role in play

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*