बीजींगने आक्रमक धोरण अवलंबल्यास आपणही आक्रमक, भारतीय हवाई दलप्रमुखांचा इशारा


चीन एलएलसीवर आक्रमक झाला तर त्याला सणसणीत उत्तर दिले जाईल. बीजिंगने आक्रमक धोरण अवलंबल्यास आपणही आक्रमक होऊ शकतो, असा इशारा हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी दिला आहे. Beijing adopts aggressive policy aggressive warns Indian Air Force


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीन एलएलसीवर आक्रमक झाला तर त्याला सणसणीत उत्तर दिले जाईल. बीजिंगने आक्रमक धोरण अवलंबल्यास आपणही आक्रमक होऊ शकतो, असा इशारा हवाई दलप्रमुख आरकेएस भदौरिया यांनी दिला आहे.

जोधपूरमध्ये भारतीय हवाई दल आणि फ्रान्सच्या हवाई दलाचा संयुक्त सराव डेझर्ट नाइट -21 वर आयोजित पत्रकार परिषदेत हवाई दल प्रमुख म्हणाले की, जर चीन आक्रमक होऊ शकतो तर आपणही होऊ शकतो. आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. पण आम्ही कोणत्याही देशाविरूद्ध सराव करत नाहीए. आपल्या क्षमता विकसित करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी हे केले जात आहे.पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानांमध्ये सर्व नवीन तंत्रज्ञान आणि सेन्सर बसवण्याची आमची तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं. भारतीय हवाई दलात फ्रान्सने बनवलेल्या ८ राफेल विमानांचा आतापर्यंत समावेश करण्यात आला आहे. फ्रान्सकडून घेण्यात येणाऱ्या ३६ राफेल विमानांपैकी ही ८ विमाने आहेत. राफेल विमानांसाठी भारताने फ्रान्ससोबत करार केला. ८ राफेल विमानं आली आहेत. आता आणखी तीन राफेल विमानं या महिन्याच्या अखेरीस भारतात दाखल होतील, अशी माहिती हवाई दल प्रमुखांनी दिली.

Beijing adopts aggressive policy aggressive warns Indian Air Force

पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व ३६ राफेल विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश केला जाईल. ११४ मल्टीरोल लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी राफेल देखील एक महत्त्वाचा उमेदवार आहे. भारतीय वायुसेनेने डीआरडीओशी ५ व्या पिढीच्या लढाऊ विमानांच्या उत्पादनाचा कार्यक्रम सुरू केला आहे, असे भदोरिया यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती