सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांना मदतीची मागणी करत होता, आता का देत नाही, खासदार संभाजीराजेंचा सवाल

मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत द्या, अशी मागणी केली होती. मग, आता ते का देत नाहीत, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.


विशेष प्रतिनिधी 

सोलापूर : मुख्यमंत्र्यांनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत द्या, अशी मागणी केली होती. मग, आता ते का देत नाहीत, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

संभाजीराजे यांनी आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यांमध्ये मु्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडायला हे असा सल्ला देतानाच ठाकरे यांनी सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या मागणीची आठवण त्यांना करून दिली आहे. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ही मागणी करणारे ठाकरे आता सत्तेवर असल्याने त्यांना ही मदत देणे शक्य आहे. मग ते का देत नाहीत, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान पाहणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी पंढरपूर दौरा केला. त्यांनी कासेगाव परिसरात द्राक्ष बागा डाळिंब बागा, ऊस शेतीची नुकसान पाहणी केली. पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपला लढा सुरु असून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी घेऊन जाणार आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी दर्शवला.

पावसाने पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात हाहा:कार उडविला. पंढरपूर शहरात सर्वाधिक 75 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झालं आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी , कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.

विविध ठिकाणी फळबागांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागात सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करुन आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*