भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर, लडाख वेगळे दाखवण्याचा बीबीसी यूकेचा खोडसाळपणा, जनक्षोभानंतर मागितली माफी

BBC UK apologizes Over Presenting Wrong Indian Map

बीबीसीने भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या एका व्हिडिओमध्ये बीबीसीने चुकीच्या पद्धतीने भारताचा नकाशा दाखवत जम्मू-काश्मीर, लडाखला पूर्णपणे वेगळे केले होते. यानंतर मोठा वाद उफाळला होता.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बीबीसीने भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या एका व्हिडिओमध्ये बीबीसीने चुकीच्या पद्धतीने भारताचा नकाशा दाखवत जम्मू-काश्मीर, लडाखला पूर्णपणे वेगळे केले होते. यानंतर मोठा वाद उफाळला होता. लेबर पक्षाचे खासदार वीरेंदर शर्मा यांनी बीबीसीला याबाबत पत्र लिहून जनक्षोभाची जाणीव करून दिली. यानंतर बीबीसी यूकेने याबाबत माफी मागितली आहे. BBC UK apologizes Over Presenting Wrong Indian Map

वास्तविक, बीबीसी लंडनने अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याविषयी एक व्हिडिओ बनविला होता. ज्यात भारताचा उल्लेखही होता. पण जेव्हा भारत दाखवण्यात आला, तेव्हा जम्मू-काश्मीर, लडाख नकाशापासून विभक्त दर्शवण्यात आले. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावरून चांगलाच संताप व्यक्त केला होता, त्याचबरोबर भारतीय वंशाच्या खासदारांनीही याविषयी ब्रिटनमध्ये आवाज उठविला.इंडो-ब्रिटिश ऑल पार्टी पार्लमेंटरी ग्रुपचे प्रमुख वीरेंद्र शर्मा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीबीसीला पत्र लिहून त्वरित तो नकाशा हटवण्याचे आवाहन केले. वीरेंद्र शर्मा यांनी आपल्या पत्रात लिहिले की, हा नकाशा चुकीच्या पद्धतीने भारताला दर्शवित आहे. लडाख हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे. अशा चुकीच्या नकाशामुळे ब्रिटनमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीयांना धक्का बसला असून भारतीयांचा अवमान होत आहे.

वीरेंद्र सिंग यांच्या पत्रानंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर याप्रकरणी समर्थन मिळाले. जनक्षोभाची दखल घेत अखेर बीबीसीला मंगळवारी माफी मागावी लागली. तसेच व्हिडिओमध्ये बीबीसीने नकाशाचे योग्य स्वरूप दर्शविले.

BBC UK apologizes Over Presenting Wrong Indian Map

तथापि, यापूर्वी जम्मू-काश्मीर, लडाखचा चुकीचा नकाशा जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाइटवरदेखील सादर करण्यात आला होता. भारताने डब्ल्यूएचओच्या प्रमुखांना एक आक्षेप नोंदवत पत्र लिहिले, त्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आली.

BBC UK apologizes Over Presenting Wrong Indian Map

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी