जिनासमर्थक विद्यार्थी नेत्याला कॉंग्रेसने बिहारमध्ये दिली उमेदवारी

बिहारमध्ये कॉंग्रेसने मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन चक्क जिना समर्थक अलीगढ मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष डॉ. मकसूर अहमद उस्मानी याला उमेदवारी दिली आहे. जेल मतदारंसघातून माजी केंद्रीय मंत्री ललितनारायण मिश्रा यांच्या नातवाला उमेदवारी नाकारून उस्मानी याला पसंती देण्यात आली आहे.


वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमध्ये कॉंग्रेसने मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन चक्क जिना समर्थक अलीगढ मुस्लिम विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष डॉ. मकसूर अहमद उस्मानी याला उमेदवारी दिली आहे. जेल मतदारंसघातून माजी केंद्रीय मंत्री ललितनारायण मिश्रा यांच्या नातवाला उमेदवारी नाकारून उस्मानी याला पसंती दिली आहे.

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचे छायाचित्र लावावे यासाठी उस्मानी याने आंदोलन केले होते. या प्रकरणी त्याच्यावर देशद्रोहाचा खटलाही चालू आहे. या मतदारसंघातून रिषी मिश्रा हे कॉंग्रेसकडून इच्छुक होते. त्यांनी नुकताच संयुक्त जनता दलातून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारी नाकारल्यावर मिश्रा म्हणाले, जिनांचा फोटो लावण्यासाठी आंदोलन करणाऱ्याला कॉंग्रेसने उमेदवारी देणे दु:खदायक आहे.

उस्मानीच्या जागी इतर कोणालाही उमेदवारी दिली असती तर माझी हरकत नव्हती. बिहार कॉंग्रेस अध्यक्ष मदनमोहन झा आणि कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उस्मानीला उमेदवारी का दिली याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. कॉंग्रेस गांधीवादी विचारांवर चालणारा पक्ष आहे; पण त्याला आता जिनावादीपक्ष बनविले जात आहे. जिन्नांचा फोटो गांधीजींच्या भारतात कधीही मान्य केला जाणार नाही.

बिहार भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार गिरीराज सिंग यांनीही कॉंग्रेसवर हल्ला केला आहे. त्यांचा जेल मतदारसंघातील उमेदवार जिनाचा समर्थक आहे का नाही हे कॉंग्रेस आणि महागठबंधन यांनी स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*