संघाच्या मुखपत्राचे माजी संपादक बालाशंकर यांचा माकप-भाजपचे साटेलोटे असल्याचा दावा; उमेदवारी नाकारल्यानंतर केला आरोप

विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये सत्ताधारी माकप (सीपीआयएम) आणि भाजप यांच्यात तीन ठिकाणांसाठी गुप्त समझोता झाला असल्याचा आरोप ऑर्गनायजरचे माजी संपादक बालाशंकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. Balashankar attacks on Kerala BJP

भाजपचे तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले बालाशंकर म्हणाले की, काही नेत्यांमुळे आपले नाव कापले गेले. राज्यातील किमान तीन मतदारसंघासाठी गुप्त करार झाल्याचा आपल्याला संशय आहे. चेंगन्नूर, अरनमुला आणि रन्नी या मतदारसंघात दोन्ही पक्षात करार झाल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन यांनी बालाशंकर यांचे आरोप नाकारले आहेत. ते म्हणाले, आरोपाला उत्तर देण्याची गरज नाही. कॉग्रेसने देखील छुप्या मिलीभगतबद्धल टीका केली आहे. विरोधी पक्षनेते रमेश म्हणाले, की आम्ही दोघांच्या गुप्त कराराबाबत नेहमीच सांगत आलो आहोत. सोन्यासह सर्व प्रकरणाची केंद्रीय तपासणी यंत्रणांकडून संथ गतीने चौकशी केली जात आहे. आता हे आरोप संघाच्या पदाधिकाऱ्याने केले आहेत.

Balashankar attacks on Kerala BJP

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*