मुख्यमंत्री कार्यालयावर बाळासाहेब थोरात भडकले, औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्याने नाराज

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास कॉंग्रेस सातत्याने विरोध करत आहे. तरी देखील मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात चांगलेच भडकले आहेत. Balasaheb Thorat erupted at the Chief Minister’s office, annoyed at the mention of Aurangabad as Sambhajinagar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास कॉँग्रेस सातत्याने विरोध करत आहे. तरी देखील मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात चांगलेच भडकले आहेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे, अशा शब्दांत थोरात यांनी खडसावले आहे.औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करा, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची भूमिका आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आल्याने भाजप आणि मनसेकडून शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवला आहे.

अशात मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतर करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे म्हणत महाविकास आघाडी करताना ठरवलेल्या समान कार्यक्रमाची आठवण करून दिली.

Balasaheb Thorat erupted at the Chief Minister’s office, annoyed at the mention of Aurangabad as Sambhajinagar

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करू या, असेही थोरात म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*