खुर्चीसाठी बाळासाहेबांनी दिलेली हिंदूत्वाची शिकवण विसरलात, चंद्रकांत पाटील यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका


खुर्चीसाठी बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणे तुम्ही विसरला आहात. बाळासाहेबांच्या नावाने अजुन किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : खुर्चीसाठी बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणीचे पालन करणे तुम्ही विसरला आहात. बाळासाहेबांच्या नावाने अजुन किती दिवस पोळ्या भाजणार? खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे.balasaheb thakre hindu hruday samrat

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवरुन सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती काल आली. तुम्ही काल भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षाने जाणवत आहे. ज्यांच्या स्मारकाठिकाणी तुमचा कालचा कार्यक्रम चालला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्वदेखील तुमच्या पचनी पडले नाही.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गाने आम्ही चालत आहोत. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्तव्य केले की, हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र इसको लेकर भ्रम पैदा करने वाले लोग है, हे मुळात तुमच्यासाठी होते. हिंदुत्वाचा वापर करुन आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी तुमचा हा सगळा आटापिटा सुरू आहे. तुमच्याकडून आम्हाला हिंदुत्व शिकून घेण्याची गरज नाही. कारण तुमचं हिंदुत्व सोयीप्रमाणे बदलते, असे पाटील म्हणाले.

balasaheb thakre hindu hruday samrat

पाटील म्हणाले की, मी कुटुंबप्रमुख आहे, असे तुम्ही म्हणालात. याशिवाय काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी दौऱ्यावेळी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे वक्तव्य तुम्ही केले होते. मग जे कुटुंब बळीराजाच्या जीवावर चालतं त्यांच्यावर एकही शब्द न बोलता काल जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या सद्यपरिस्थितीचा उल्लेख करणे टाळले. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरही चिडीचूप बसलात. केवळ आपलेच ढोल बडविण्यात तुम्ही समाधान मानले. एकंदरीत कालचे मुख्यमंत्र्यांचे भाषण हे अभ्यासशून्य आणि सूड भावनेने प्रेरित होते. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, 11 कोटींचे कुटुंब तुम्हाला सांभाळायचे आहे. केवळ भाषणबाजी करुन काहीही होणार नाही, असे पाटील यांनी सुनावले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती