राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंची अ‍ॅलर्जीच, ट्विटरवरूनही अभिवादन केले नाही


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचे ट्विटही केले नाही. या कृतीतून न बोलता त्यांनी शिवसेनेला आपली जागा दाखवून दिली असल्याची चर्चा आहे. Balasaheb Thackeray did not even greet Rahul Gandhi on Twitter


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचे ट्विटही केला नाही. या कृतीतून राहुल यांनी शिवसेनेबद्दल त्यांना वाटत असणारी नकारात्मकता व्यक्त करत त्यांनी शिवसेनेला जागा दाखवून दिल्याची चर्चा आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र त्यांच्याबाबत आदर व्यक्त करणासाठी चार ओळीचा ट्विट ही केला नाही. सामनातून दर चार दिवसांनी राहुल गांधी यांची आरती ओवाळली जात असताना त्यांनी मात्र शिवसेनेला जागा दाखवून दिली, असा आरोप दिनेश कानजी यांनी आपल्या लेखात केला आहे.मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी इंदिरा गांधींपासून अहमद पटेलांपर्यंत सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला त्यांना अभिवादन करावेसे वाटले नाही. शिवसेनाप्रमुखांना अनुल्लेखाने मारण्याचा हा प्रकार होऊनसुद्धा गप्प बसणे ही शिवसेनेची लाचारी नाही का? असा सवाल नेटकरी करत आहेत, असं लेखात म्हटलं आहे.

काँग्रेसकडून शिवसेनेचा असा सतत पाणउतारा होत असताना शिवसेना मात्र सत्तेच्या लोभासाठी त्यांना घट्ट चिकटून बसली आहे. अपमानाकडे दुर्लक्ष करून वारंवार सामनामधून राहुल गांधींवर स्तुती सुमनांची उधळण केली जाते. शिवसेनेच्या या दयनीय अवस्थेवर सोशल मीडियातून झोड उठवण्यात आली, असं देखील लेखात म्हटलं आहे. यावरून भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी दिनेश कानजी यांच्या लेखाची लिंक शेअर करत शिवसेनेवर टीका केली.

Balasaheb Thackeray did not even greet Rahul Gandhi on Twitter

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था