बाबा रामदेव म्हणतात, देशाचे नेतृत्व करू शकेल असा एक नेता दाखवा, मी मोदींना आजच सोडून देतो

देशाचे नेतृत्व करू शकेल अशा एका व्यक्तीचे नाव दाखवा. एक नेता सांगा. मी आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोडून देतो असे सांगत मोदी कधीही शेतकरी विरोधी असू शकत नाही, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. सगळ्या विरोधी पक्षात कोणा एका नेत्याचे नाव सांगा ज्याची निती, नियत आणि चरित्र मोदींपेक्षा चांगली आहे, असे आव्हानही त्यांनी दिले. Baba Ramdev says, show a leader who can lead the country, I will Leave Modi today


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशाचे नेतृत्व करू शकेल अशा एका व्यक्तीचे नाव दाखवा. एक नेता सांगा. मी आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोडून देतो असे सांगत मोदी कधीही शेतकरी विरोधी असू शकत नाही, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. सगळ्या विरोधी पक्षात कोणा एका नेत्याचे नाव सांगा ज्याची निती, नियत आणि चरित्र मोदींपेक्षा चांगले आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.

एका वृत्तवाहिनीवर बोलताना मोदी विरोधकांना आव्हान देताना बाबा रामदेव म्हणाले, मी मोदींना गेल्या २० वर्षांपासून ओळखत आहे. ते कधीही शेतकरी विरोधी असू शकणार नाही. मी स्वत: एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेती केली आहे, शेतात नांगर चालविला आहे. २५ वर्षे मी शेतात काम करत होतो. त्यामुळे शेतकऱ्यांची दु:खे काय आहेत मला चांगले माहित आहे. ही दु;खे कमी करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे.ते म्हणाले की, किमान हमी भावाचा (एमएसपी) कायदा रद्द होणार नाही हे सरकारने सांगितले आहे. सरकार हे लिहून द्यायलाही तयार आहे. त्यामुळे याबाबत कोणत्याही प्रकारचा संशय ठेवण्याची गरज नाही. आपल्या जवळच्या बाजार समितीमध्ये माल विकायचा की दुसरीकडे हा पूर्णपणे शेतकऱ्यांचा अधिकार आहे. खुल्या बाजारात माल विकण्याची संधी शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे.

Baba Ramdev says, show a leader who can lead the country, I will Leave Modi today

देशात कोरोना लसीवरून सुरू असलेल्या वादाबाबत बाबा रामदेव म्हणाले की, मोदी हे समाधान पुरुषाच्या रुपात काम करत आहेत. ते प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु, काही लोक राजकारण करत आहेत. लस ही कोणत्या पक्षाची नसते, कोणत्या धर्माची नसते. यापुढे जाऊन मी म्हणतो की लस ही कोणत्या कंपनीचीही नसते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*