जहां अयोध्या सियाराम की,देती समता का संदेश..कला और संस्कृति की धरती ,धन्य-धन्य उत्तर प्रदेश राम मंदिर चित्ररथाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला पार पडलेल्या राजपथेवरील सोहळ्यात नेत्रदीपक चित्ररथांचा समावेश होता. या चित्ररथ सोहळ्यात कोणत्या राज्याने पहिला मान पटकवला याची उत्सुकता सर्वांनाच असते. या चित्ररथ सोहळ्यात राम मंदिराच्या चित्ररथाने पहिला क्रमांक पटकवला आहे.सोशल मिडीयावर देखील हा चित्ररथ मोठ्या प्रमाणात शेअर केला गेला आहे.Ayodhya Siyaram Message of Equality Land of Art and Culture, Uttar Pradesh Ram Mandir Chitrarathala

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या चित्ररथाला बक्षीस दिले जाणार आहे. योगी आदित्यनाथ सरकारचे या चित्ररथामुळे खूप कौतुक होत आहे. उत्तर प्रदेशातून यंदा राम मंदिराचा देखावा असलेला चित्ररथ साकारण्यात आला होता. सर्वांच्या नजरा राजपथावर या चित्ररथाकडे खिळल्या होत्या. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्ररथाची यंदा थीम काय असावी यावर प्रत्येक राज्य विचार करत असते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र काहितरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण असावं या भावनेतून भारतीयांचे श्रद्धास्थान श्री राम प्रभूंच्या मंदिराचे चित्ररथ साकारले.काही दिवसांपूर्वी राम मंदिराचे भूमीपूजन पार पडले.

चित्ररथावर राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याची कल्पना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची होती. राम मंदिर कसं असेल याची उत्सुकता लोकांना आहे. नुकतंच राम मंदिराचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. त्यामुळे आम्ही राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचं ठरवलं ही कल्पना सर्वांना आवडली असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

चित्ररथावर राम मंदिराची प्रतिकृती तयार करण्यासाठी 20 दिवसांचा अवधी लागला. त्यानंतर हा रथ दिल्लीला रवाना करण्यात आला. या चित्ररथाची सर्वत्र चर्चा होती. राम मंदिर कसे असेल याची उत्सुकता देखील सर्वांना होती. अखेर 26 जानेवारीला सर्वांना ही प्रतिकृती चित्ररथाद्वारे पाहता आली. या चित्ररथाला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे. 

Ayodhya Siyaram Message of Equality Land of Art and Culture, Uttar Pradesh Ram Mandir Chitrarathala

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती