कोरोनाच्या नियमावलीचा भंग केल्यास हॉटेल, सिनेमागृहांना ठोकणार टाळे ; संसर्ग वाढत असल्याने काढला नवा आदेश

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनाच्या नियमावलीचा भंग केल्यास हॉटेल आणि सिनेमागृहांना टाळे ठोकले जातील, असा इशारा राज्य सरकारने दिला असून त्यांबाबतचा आदेश सोमवारी काढला आहे. Avoid hitting hotels and cinemas if you break the rules of corona

राज्यात कोरोनाचे संकट अधिकच वाढले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा नवा आदेश सरकारने काढला आहे. सोमवारी कोरोनाचे 1712 नवे रुग्ण आढळले असून चौघांचा मृत्यू झाला. 1063 जण बरे झाले.एकूण 3 लाख 18 हजार 642 जण बरे झाले आहेत. मुंबईत 3 लाख 45 हजार 669 प्रकरणे असून 14 हजार 542 ऍक्टिव्ह तर 11 हजार 535 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात 15 हजार 51 नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 23 लाख 29 हजार 464 एवढी असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Avoid hitting hotels and cinemas if you break the rules of corona

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*