काँग्रेस-शिवसेना औरंगाबाद – संभाजीनगर वॉर; ‘दोस्त दोस्त ना रहा’; दोन्ही पक्षांची महाआघाडीत कुचंबणा

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचे नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असुनही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर असे झालेले नाही.आता याच मुद्यावरून गल्ली पासून दिल्ली पर्यंत राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. aurangabad – sambhajinagar war between shiv sena and congress

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत सांगातले होते की ,आमचा नामांतरास विरोधच आहे. त्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झालेली आहे.यावर लगेचच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली . ‘संभाजीनगर हे नामकरण होणारच. ती शिवसेनाप्रमुखांची आधीपासूनची भूमिका आहे. मात्र लॉकडाऊनमुळे मंत्रालय देखील ठप्प झाली आणी यामुळे अधिक कालावधी लागतोय . नामांतराच्या विरोधकांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा सुध्दा खैरेंनी दिला .युती तोडून कायमच शत्रू असणार्या कॉंग्रेस सोबत शिवसेना ने आपले बंधन बांधले .आता ह्राच बंधनाने सेनेला चांगलच बांधून ठेवलं आहे.

संजय निरूपम ने तर सेनेला ‘हात’ दाखवून धमकीच दिली आणि सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देखील .त्यांच्या या ईशार्याला प्रत्युत्तर म्हणून खैरेंनी देखील ‘बाण’ सोडले .मंत्रीपदासाठी सत्तेत रहावेच लागते असा शालजोडा देत आम्ही तुम्हाला मोजत नाही असे दाखवण्याचा व्यर्थ प्रयत्नही केला .

aurangabad – sambhajinagar war between shiv sena and congress

या वादात मनसेने आपला तगादा लावून धरला आहे असेल हिम्मत तर करा संभाजी नगर. अब्दुल सत्तारांना दस्तुरखुद्द जनाब उद्धव ठाकरे यांनी संभाजी नगर ऐवजी औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली हे खरे आहे का?असा सवाल करत नांदगावकरांनी मनसेचे सुध्दा संभाजी नगरवर विशेष प्रेम असल्याचे दाखवून दिले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*