औरंगाबाद बलात्कार प्रकरण : पीडितेला संरक्षण द्या व राजकीय दडपण झुगारून द्या; भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची पोलिसांकडे मागणी


  • राजकीय दडपणाखाली येऊन पोलिसांची हातावर घडी, तोंडावर बोट

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षाविरुद्ध बलात्कार व जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर पोलिसां कडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यासंदर्भात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी पोलिस आयुक्त श्री निखील गुप्ता यांना निवेदन दिले असुन पोलिस कारवाई होत नसल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे.विजया रहाटकर ह्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा असल्याने त्यांनी नुकत्याच शक्ती विधेयकात काही महत्त्वाचे बदल सुचवले होते. Aurangabad rape case: Protect the victim BJP national secretary Vijaya Rahatkar demand to the police

सदरील प्रकरणी पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून कायद्यानुसार कठोर कारवाई केली पाहिजे, निःष्पक्ष तपास करून न्यायालयीन कार्यवाही विनाविलंब चालू केली पाहिजे. जर पोलिसांनी कर्तव्य कुचराई केल्यास विविध प्रकारे निदर्शने- आंदोलने करण्याचा, सरकारला प्रश्न विचारण्याचा, धारेवर धरण्याचा घटनादत्त अधिकार वापरण्याचा हक्क आम्हाला असेही यात नमूद करण्यात आले आहे.सदरील निवेदनात ‘एफआयआर’नुसार, आरोपीचे नाव मेहबूब शेख (रा. शिरूर, जिल्हा बीड) असे आहे. माध्यमांमधील विविध वृत्तांनुसार, शेख हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असून तो राजकीयदृष्ट्या प्रभावी व्यक्ती आहे. शिवाय, शेख हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असल्याचे त्या पीडित युवतीनेही एका व्हिडीओद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

महिला बलात्काराचा एवढा गंभीर गुन्हा दाखल होऊन आज दि. ७ जानेवारी २०२१ रोजी तेरा दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसत आहे.तपास नाही, न्यायालयीन कोणतीही कार्यवाही नसताना आरोपीला वरिष्ठ पोलीसांनीअप्रत्यक्षरीत्या क्लीन चीट दिली आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे.

अशीच क्लीन चीट राज्य सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याकडूनही जाहीररीत्या दिली गेली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यातील सत्तारूढ पक्षाने (ज्यांच्याकडे संवेदनशील गृहखाते आहे) आरोपीला प्रेस काॅन्फरन्स घेऊन क्लीन चीट दिली आहे.

क्लीन चीट देण्याचा पोलिसांचा व राज्यातील सत्तारूढ पक्षाचा प्रकार पाहता, पोलिसांवर गृहखात्याचे दडपण असल्याचे दिसते आहे. राजकीय दडपणाखाली येऊन पोलिसांची हातावर घडी, तोंडावर बोट ही कृती अस्वस्थ करणारी आणि चीड आणणारी आहे.

त्यातच पीडिता बेपत्ता झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्यात तथ्य असेल तर त्यास पोलिस जबाबदार असतील. तिची ओळख उघड न करता पीडितेला संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.

Aurangabad rape case: Protect the victim BJP national secretary Vijaya Rahatkar demand to the police

एकीकडे राज्य सरकारने महिला अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती’ विधेयक विधिमंडळात मांडले आहे. त्यात काही कठोर तरतुदींचा समावेश आहे. पण दुसरीकडे, हे विधेयक मांडणार्या गृहखात्यातूनच बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न चालू असण्याचा संशय बळकट होत आहे ह्या सर्व बाबतीत जाब विचारण्यात आला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती