ऑडीओ क्लिप व्हायरलनंतर भाजपमध्ये खळबळ,चंद्रकांतदादांनी खडसेंशी साधला ऑनलाईन संवाद

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाराज भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सर्वत्र चर्चा आहे. त्यात मंगळवारी रात्री खडसेंची कार्यकर्त्यां सोबतची संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे भाजपात देखील खळबळ उडाली असून तातडीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाइन बैठक बोलवली. या बैठकीत खडसेनी सहभाग घेत चंद्रकांतदादांशी गुप्तगु झाली आहे. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार, राष्टीय संघटन प्रमुख संतोष कुमार, केंद्रीय मंत्री संतोष गंगवार, विजय पुराणिक आदी उपस्थित होते. माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणूकीच्या तयारीत व्यस्त असल्याने ते ऑनलाइन बैठकीला अनुपस्थित होते. खडसेंनी मात्र या विषयांवर किंवा अन्य कोणत्याही विषयांवर बोलण्यास नकार दिला आहे.

खडसे यांचा कार्यकर्त्याशी झालेला संवाद मंगळवारी व्हायरल झाला होता योग्य सधी मिळाल्यानंतर आपण भाजप सोडण्याचा विचार करू,असे खडे यांनी त्यात म्हटल्याचे ऐकू येत होते. या क्लिपच्या सत्यतेविषयी खडसेंकडून नकार किंवा होकारही देण्यात आलेला नाही. खडसे यांना राष्टीय कार्यकारीणीवत स्थान मिळाले नसल्याददल त्यांच्या समर्थकांत नाराजी आहे. त्यांना भाजपमध्ये कोणत्याच पदावर संधी मिळाली नसल्याने खडसे समर्थक अस्वस्थ आहेत. त्यांनी काही तरी निर्णय घ्यावा यासाठी कार्यकर्ते त्यांच्याशी बोलत अतात. त्यातूच हा संवाद झाला आणि ती क्लिप व्हायरल झाली. या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी खडसेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की नाही हे समजू शकले नाही, मात्र या बैठकीला हजर राहून आपण पक्षासोबतच असल्याचे खडसे यांनी दाखवून दिले आहे.

खडसेंनी दिला बैठकीचा दुजोरा

यासंदर्भात खडसे यांना विचारले अता त्यानी बैठक झाल्याचा दुजोरा दिला आहे. या बैठकीत पक्ष संघटना बळकट करण्याविषयी, राज्यातील विविध समस्या आणि राजकीय घडामोडी याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले मात्र बैठकीविषयी अधिक बोलणे टाळले.

राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा

खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे राष्टवादीचे कार्यकर्ते ठोकपणे सांगत आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर जळगाव मधील कार्यकर्यांची एक बैठकही झाली. या बैठकीत काही जेष्ठ कार्यकर्त्यांनी खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी अट घालावी, हे सांगण्याचा प्रयत्न केला. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे याना भाजपच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लावण्याचीही सूचना होती. पवार यानी त्याकडे दुलक्ष केल्याचे बैठकीस उपस्थित असलेल्यांनी सांगितले होते. ऑक्टोबर महिन्यातच खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे बोलण्यात येत होते मात्र तसे झाले नाही.

पक्षाकडून मनधरणीचे प्रयत्न

या चर्चेनंतर वरिष्ठ नेत्यंच्या बैठकीस खडसे यांना आमत्रित करून भाजपने त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. पक्षाने आपले योग्य पद देऊन पुनर्वसन करावे,अशी खडसे याची अपेक्षा आहे भाजप आता खडसेना कसे शांत करणार, याकडे जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्याचे लक्ष लागून आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*