पंतप्रधान मोदींना विनंती केल्यामुळेच तुम्ही विधानपरिषदेत, अतुल भातखळकर यांचा टोला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरुन विनंती केल्यानंतर विधान परिषदेत गेलात. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत जाता येते, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला आहे. Atul Bhatkhalkar’s tola in the Legislative Council only because of the request of Prime Minister Modi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोनवरुन विनंती केल्यानंतर विधान परिषदेत गेलात. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत जाता येते, असा टोला भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉकचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी मी विधानसभेत तुमच्यामुळे आणि तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे, असे उध्दव ठाकरे यांनी म्हटले होते.

यावर भातखळकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेत कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जनतेने तुम्हाला कधी निवडून दिलं? मोदींना फोनवर विनंती केल्यानंतर विधान परिषदेवर गेलात तुम्ही. त्यामुळे विधानसभेत जाता येते तुम्हाला. उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदी आल्यावर त्यांची सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाच्या एका सभागृहात निवड होणे आवश्यक होते. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे विधानपरिषदेची निवडणूक होऊ शकली नाही.

विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर पडल्याने मुख्यमंत्र्यांना विधिमंडळ सदस्य होण्यासाठी दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. त्यामुळे विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त दोन रिक्त जागांपैकी एका जागेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस ९ एप्रिलला मंत्रिमंडळाने केली होती. तीन आठवडे या प्रस्तावावर राज्यपालांनी काहीच निर्णय घेतला नाही. विधान परिषदेवरील दोन रिक्त जागांवर नियुक्तीचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने जानेवारी महिन्यात राज्यपालांना देण्यात आला असता मंत्रिमंडळाची शिफारस नसल्याचा मुद्दा तेव्हा राजभवनने उपस्थित केला होता. म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या नावाची शिफारस करणारा ठरावच मंत्रिमंडळाने केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याबाबत महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. कोरोनाच्या संकटात राज्याला स्थैर्याची गरज असल्याने घटनात्मक पेच टाळण्यासाठी मंत्रिमंडळाच्या शिफारशीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती शिष्टमंडळाने राज्यपालांना केली.

मुख्यमंत्रीपदच संकटात आल्यावर उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत मध्यस्थी करण्याची विनंती केली. उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगताना कोरोनाचं संकट असताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होणं योग्य नाही, असे म्हटले होते. त्यानंतर ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होऊन त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचले होते.

Atul Bhatkhalkar’s tola in the Legislative Council only because of the request of Prime Minister Modi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था