विकला जायला सूर्य कॉंग्रेस आमदार थोडाच आहे, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न युवक कॉंग्रेस अध्यक्षाच्या अंगलट


विकला जायला सूर्य काँग्रेस आमदार थोडाच आहे, असा सवाल करीत नेटकऱ्यांनी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची टीका त्यांच्यावरच उलटविली आहे. दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही… विकला तर नसेल ना…असे ट्वीट करून #मोदी है तो मुमकिन है, असा हॅश टॅग देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा केलेला प्रयत्न तांबे यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. Attempts to criticize Prime Minister Modi backfire At Youth Congress president


विशेष प्रतिनिधी

नगर : विकला जायला सूर्य काँग्रेस आमदार थोडाच आहे, असा सवाल करीत नेटकऱ्यांनी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची टीका त्यांच्यावरच उलटविली आहे. दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही… विकला तर नसेल ना…असे ट्वीट करून #मोदी है तो मुमकिन है असा हॅशटॅग देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्याचा केलेला प्रयत्न तांबे यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.तांबे यांनी दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही… विकला तर नसेल ना… असे ट्वीट करून #मोदीहैतोमुमकिनहै असा हॅश टॅग देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मात्र, मोदींकडे असलेला हा निशाणा काँग्रेसवरच उलटला. यावर उत्तर देताना नेटकऱ्यांनी तांबे यांना चांगलेच सुनावले. सूर्याचे माहिती नाही, मात्र राज्यात सरकार स्थापनेपासून काँग्रेस दिसत नाही, विकली की काय मोदी शेठने. दोन वर्षे झाले स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत सरकार विकायला काढले की काय. विकला जायला सूर्य काँग्रेस आमदार थोडाच आहे. सूर्य आज ना उद्या दिसेलच औरंगाबादचे संभाजीनगर कधी करताय सांगा. दहा दिवसांपासून शेतकऱ्यांना सोडून काँग्रेसचे भावी अध्यक्ष दिल्ली सोडून कुठे गेले, त्यामुळे सूर्य देवता रुसली असेल, असे तांबे यांना सुनावण्यात आले आहे.

Attempts to criticize Prime Minister Modi backfire At Youth Congress president

राज्यस्तरावर काम करण्याचा आव आणणाऱ्या नेत्याला असे बालिश विनोद करणे शोभा देत नाही. सूर्य तर खूप लांबचा झाला आम्हाला ७० वर्षात काश्मिर दिसत नव्हता, अशाही अनेक कॉमेंट्स करण्यात आल्या आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती